आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aamir Khan And Katrina Kaif Launch The Title Song Of Dhoom 3

रिलीज झालं 'धूम मचा ले...' गाणं, आमिरवर वरचढ ठरला कॅटचा मायक्रो मिनी अवतार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडच्या यावर्षीच्या बहुचर्चित 'धूम 3' या सिनेमाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच रिलीज करण्यात आला होता. आता या सिनेमाचे टायटल ट्रॅक (शीर्षक गीत) लाँच करण्यात आले आहे. या गाण्याचे बोल आहेत 'धूम मचा ले...'
तुमच्या लक्षात असेलच, जेव्हा धूम फ्रेंचाइजीचा पहिला सिनेमा रिलीज झाला होता, तेव्हा या गाण्याने लोकांना आकर्षित केले होते.
या गाण्याच्या लाँचिंगला सिनेमात प्रमुख भूमिका साकारणारे आमिर खान आणि कतरिना कैफ उपस्थित होते. तसे पाहता हे गाणे आमिरने सचिन तेंडुलकरला समर्पित करायचे होते. त्यासाठी खास वानखेडे स्टेडिअमवर हे गाणे रिलीज होणार होते. मात्र काही कारणास्तव वानखेडे स्टेडियमवर आमिर हे गाणे रिलीज करु शकला नाही.
असो, या गाण्याचा लाँचिंग सोहळा जंगी होता. एकीकडे आमिर निळ्या रंगाच्या टीशर्ट आणि जीन्समध्ये दिसला, तर दुसरीकडे कतरिना गुलाबी रंगाच्या शॉर्ट ड्रेसमध्ये नजरेस पडली. यावेळी दोघांचीही केमिस्ट्री जबरदस्त वाटली.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला 'धूम 3'च्या या इवेंटची खास छायाचित्रे दाखवत आहोत...
चला तर मग पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा साँग लाँचिंगमध्ये कसे दिसले आमिर-कतरिना...