आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aamir Khan And Shahrukh Khan To Share Screen Space

शाहरुख आणि आमिर करणार एकत्र स्क्रिन शेअर

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

शाहरुख खान आणि आमिर खानने आतापर्यंत एकत्र काम केले नाही. मात्र आता भारतीय सिनेमाला शंभर वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हे दोघे दिग्गज एकत्र पडद्यावर दिसणार आहेत. भारतीय सिनेमाचा गौरव करण्यासाठी बनवण्यात आलेल्या 'बॉम्बे टॉकीज'मधील थीम साँगमध्ये दोन खान एकत्र आले आहेत.

सुत्रानुसार, आमिर खानने आपल्या भागाची आधीच शूटिंग केली आहे. मात्र शाहरुख खानच्या भागाची शूटिंग अद्याप झालेले नाही. हा सिनेमा याच्या निर्मितीपासूनच खूप चर्चेत आहे. जोया अख्तर, दिबाकर बॅनर्जी, अनुराग कश्यप आणि करण जोहर, बी टाऊनच्या या चार दिग्गज दिग्दर्शकांनी हा सिनेमा दिग्दर्शित केला आहे.