आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अतिथी संपादक आमिर खानने असा बनविला 2 मार्चचा दैनिक भास्कर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड सुपरस्टार आमिर खान शनिवारी भोपाळ येथील दैनिक भास्करच्या ऑफिसमध्ये आला होता. आमिर दैनिक भास्करचा गेस्ट एडिटर बनला आणि २ मार्चच्या वर्तमानपत्रासाठी बातम्यांची निवड केली. आमिरसाठी सर्व शहरात उत्साह बघायला मिळाला. चाहते त्याची एक झलक बघण्यासाठी खूपच उत्सूक होते. आमिर जेव्हा दैनिक भास्करच्या ऑफिसमध्ये आला तेव्हा बाहेर चाहत्यांची मोठी गर्दी झाली होती. आमिरनेही चाहत्यांना हात हालवून अभिवादन केले.
आमिरचे भास्कर ऑफिसमध्ये जोरदार स्वागत केले. त्यानंतर भास्करचे संपादक यांच्यासोबत दिर्घकाळ गप्पा मारल्यानंतर आमिरने 2 मार्चच्या वर्तमानपत्रासाठी काही बातम्यांची निवडदेखील केली.
आमिरसाठी 7000 प्रश्न
आमिरला भास्करच्या काही वाचकांनी एसएमएसच्या माध्यमातून प्रश्न विचारले होते. त्याला 24 तासांमध्ये जवळपास 7000 प्रश्न विचारले गेले. यामधील 4000 वाचकांनी आमिरला एकच प्रश्न केला, की तो राजकारणात का येत नाही? याचे उत्तर आमिरने अशाप्रकारे दिले, 'मी ज्या माध्यामात आहे त्यात मी आनंदी आहे. मला लोकांचे मनोरंजन करायला आवडते. मी लोकांच्या चेह-यावर आनंद आणले तर तेच माझे सर्वस्व आहे मला याशिवाय दुसरे काही नकोय. देशसेवा करण्यासाठी गरजेचे नाही की राजकारणात यावे लागते.'
4000 हजार लोकांनी मॅसेजच्या माध्यमातून विचारला एकच प्रश्न
जेव्हा आमिरला सांगितले, की त्याला 4000 हजार लोकांनी एकच प्रश्न केला आहे, की 'तो राजकारणात का येत नाही?' यावर आमिरला धक्का बसला आणि त्याने 'ओह माय...4000 लोकांनी...' अशी प्रतिक्रिया दिली.
त्यानंतर आणखी एक प्रश्न होता, 'सध्या तो कोणत्या पक्षाला पाठिंबा देतो?'
यावर आमिर म्हणाला, 'हे खूपच अवघड आहे. मी कोणत्याच पक्षाला पाठिंबा देत नाही आणि देणारही नाही. पाठिंबा देण्यापूर्वी तुम्हाला अनेक गोष्टींवर लक्षकेंद्रीत करावे लागते. ते भ्रष्टाचारी नकोत... त्यांनी काही चुकिचे करायला नको. जर तुम्ही एखाद्या पक्षाला पाठिंबा दिला आणि तो पक्ष चांगला नसला तर त्याची जबाबदारी तुम्ही घेऊ शकत नाही.'
आमिरने दिला सल्ला:
आमिरने संपादकांसोबत बातचीत करताना असेही सांगितले, की प्रत्येक नागरिकाने मतदान करणे आवश्यक आहे. हे नागरिकांचे कर्तव्य आहे. तो स्वत: प्रत्येक निवडणुकीत मतदान करायला विसरत नाही. तो मुंबईत नसला तर फ्लाइट पकडून तो मतदान करण्यास येतो.
शोची वेळ 11 वाजता का?
एका विद्यार्थ्याने हा प्रश्न विचारला, तेव्हा आमिर हसला आणि म्हणाला, 'मी हा शो जर रविवार ऐवजी दैनंदिन वेळेत प्रसारित केला किंवा रोज रात्री 8च्या नंतर प्रसारित केला तर तुम्ही 'दिया और बाती' बघण्यासाठी चॅनल बदलणार किंवा बातम्या बघायला सुरू कराल. मला 'दिया और बाती'सारख्या मालिकांची खूप भिती वाटते. मला माहित आहे माझा यांच्या पुढे पराभव होऊ शकतो. माझा शो कुणीच बघणार नाही.'
बातचीत करताना आमिर खानला ग्रीन टी देण्यात आला तेव्हा त्याने चहाला लक्ष देऊन पाहिले आणि चहा देणा-या व्यक्तीला म्हणाला 'ही ग्रीन टी आहे का...? माफ करा पण मला साधाच चहा द्या.' हसत म्हणाला, 'मला परदेशी ग्रीन टी नाही देशी चहाच आवडतो.'
कसा बनवतात 'सत्यमेव जयते'
आमिरला एका विद्यार्थ्याने जेव्हा हा प्रश्न विचारला, तेव्हा यावर तो म्हणाला, 'शोसाठी आमची आठ ते दहा लोकांची कोर टीम असते. ते शोमध्ये दाखवल्या जाणा-या विषयांवर संशोधन करतात. सर्वात पहिले आम्ही काही विषयांची निवड करतो. त्यावर चर्चा आणि वादविवाद करतो. सर्व ठरल्यानंतर संशोधन करून एपिसोड बनवले जातात.'
'सत्यमेव जयते 2'चे प्रमोशन
भास्कर ऑफिसला भेट दिल्यानंतर आमिर कोर्टयार्ड बाय मॅरियटने त्याचा शो 'सत्यमेव जयते 2'च्या प्रमोशनच्या कार्यक्रमात सहभागी झाला होता. या कार्यक्रमासाठी शहरातील जवळपास 200 लोकांना आमंत्रित केले होते. त्यामध्ये अधिकतर शाळेतील आणि कॉलेजचे विद्यार्थी होते. यावेळी आमिरने त्याचे मत व्यक्त केले आणि लोकांच्या प्रश्नाचेही उत्तर दिले. शोविषयी बोलताना आमिरने सांगितले, की पहिल्या पर्वात त्याला लोकांचे अफाट प्रेम मिळाले आताही अशीच अपेक्षा आहे, की दुस-या पर्वालाही लोक तेवढेच पसंत करतील.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि आम्ही तुम्हाला सांगणार आहोत असे काही प्रश्न, जे लोकांनी मॅसेजच्या माध्यमातून आमिर खानला विचारले आहेत. यातील काही प्रश्नांचे उत्तर तुम्हाला आजच्या(2 मार्च) दैनिक भास्करच्या अंकात वाचायला मिळतील...