आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
Install AppADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अॅप
आमिर खान बॉलिवूडमध्ये खूप प्रसिद्ध आहे. मात्र त्याला अलीकडेच एका मंदिराच्या दानपेटीतून पैसे चोरी करताना पकडण्यात आले. आमिरला पकडून लोक त्याला पोलिसांच्या ताब्यात देत होते. मात्र तेवढ्यात सिनेमाची नायिका अनुष्का आली आणि तिने लोकांना समजवले.
वाचून आश्चर्य वाटले असेल मात्र आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, हा सगळा एका सिनेमाचा भाग होता. ‘पीके’ सिनेमातील हे दृश्य जयपूरमध्ये शूट करण्यात आले. विशेष म्हणजे जयपूरच्या स्थानीय कलावंतांना या सिनेमात काम करण्याची संधी मिळाली.
आमिरला चोरी करताना पकडणार्या कलावंताने सांगितले की, माझ्यासोबत आणखी एक स्थानीय कलावंत अमित आर्यनसुद्धा आहे. टोंक रोड स्थित एका मंदिरात हे दृश्य चित्रीत करण्यात आले. यात आमिर खान मंदिराच्या दानपेटीतून पैसे चोरण्याचा प्रयत्न करतो. मात्र मंदिरातील पुजारी त्याला पाहतो आणि आरडाओरड सुरू करतो. तितक्यात आम्ही तेथे जातो आणि त्याला पकडतो. आमिरला मारण्यासाठी जेव्हा मी हात उचलतो तितक्यात अभिनेत्री अनुष्का येते आणि तो चोर नसल्याचे सांगते.
Copyright © 2020-21 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.