आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

‘धूम-3’साठी ‘सत्यमेव जयते-2’ लांबणीवर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंकमिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खान साधारणत: आपल्या निर्णयावर ठाम असतो. मात्र, ‘सत्यमेव जयते-2’सह छोट्या पडद्यावर पुन्हा प्रेक्षकांच्या भेटीला येणे त्याने पुढे ढकलले आहे. आपल्या व्यग्र वेळापत्रकामुळे त्याने हा निर्णय घेतला आहे. सूत्रानुसार, ‘सत्यमेव जयते’चा दुसरा भाग 26 जानेवारीच्या औचित्यावर सुरू व्हावा, असे स्टार प्लस वाहिनीला वाटत होते. यासाठी त्यांच्याकडून सर्व प्रकारचे प्रयत्नही केले गेले. राजकारणात होणार्‍या भ्रष्टाचाराच्या मुद्याची निवडही केली गेली.

परंतु आपला आगामी चित्रपट धूम-3च्या प्रचारामध्ये आणि सत्यमेव जयते-2च्या प्रसारणामध्ये लटकत राहण्याची त्याची इच्छा नाही. त्यामुळे आता स्टार प्लस वाहिनी ही मालिका मार्च-एप्रिलमध्ये प्रसारित करण्याचा विचार करत आहे. या वेळी आमिर खान अधिक संशोधन करून प्रेक्षकांसमोर येऊ इच्छित असल्याने त्याने निवांत वेळ मागितला आहे. प्रेक्षकांच्या अपेक्षेपेक्षा खूप जास्त देण्याचा तो प्रयत्न करणार आहे.