आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

मुलगा आणि पत्नीसमवेत आमिर राहतोय चक्क भाड्याच्या घरात !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पत्नी किरण आणि मुलगा आझादबरोबर भाड्याच्या घरात राहण्याची वेळ आमिर खानवर आली आहे. आमिरने स्वतःचे घर विकले की काय, असे काय घडले की आमिरला भाड्याच्या घरात राहावे लागत आहे ? असे एक ना अनेक प्रश्न त्याच्या चाहत्यांच्या मनात येणे स्वाभाविक आहे. चला तर मग आमिरने कुठे भाड्याचे घर घेतले हे आम्ही तुम्हाला सांगतो.
बातमी अशी आहे की, आमिर खान त्याच्या आगामी 'धूम 3' या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी सध्या शिकागोमध्ये आहे. आमिर तीन महिने येथे राहणार आहे. एवढा काळ मुलगा आणि पत्नीपासून दूर राहण्याची आमिरची इच्छा नव्हती. म्हणून आमिर त्यांना आपल्या सोबत शिकागोला घेऊन गेला. येथे आमिरने तीन महिन्यांसाठी एक अपार्टमेंट भाड्याने घेतले आहे.
तसे पाहता यशराज फिल्म्सने एका शानदार हॉटेलमध्ये आमिरची राहण्याची व्यवस्था केली होती. मात्र हॉटेलमध्ये घरासारखे वातावरण नसते. म्हणूनच आपल्या चिमुकल्यासाठी आमिरने अपार्टमेंटच भाड्याने घेण्याचा निर्णय घेतला. आता आमिरप्रमाणे अभिषेक बच्चनही अपार्टमेंट भाड्याने घेण्याच्या विचारात असल्याचे समजते. 'धूम 3' मध्ये अभिषेक महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. या चित्रपटाचे शेड्यूल तीन महिन्यांचे असल्यामुळे अभिषेकने हा निर्णय घेतला. त्यालाही आमिरप्रमाणेच पत्नी आणि बाळापासून दूर राहायचे नाहीये. त्यामुळे किरण आणि आझादप्रमाणेच ऐश्वर्या आणि आराध्याचाही शिकागोला मुक्काम असणार आहे.
FIRST LOOK : 'धूम 3'मध्ये आमिर करणार धूम
आमिर खानचे पाणावलेले डोळे पाहून सनीलाही आवरले नाही अश्रू
आमिर खान राज्याचा ब्रँड अ‍ॅम्बेसेडर
PHOTOS : आमिर खान दिसला मुलगा आझादबरोबर