आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

आदित्य चोप्राची पार्टी, आमिरची सरबराई...

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
गतकाळात कोणत्याही चित्रपटाची सिल्व्हर अथवा गोल्डन ज्युबिली किंवा 100 दिवस पूर्ण झाल्यावर सेलिब्रेशन केले जात होते. यामध्ये निर्माता आणि दिग्दर्शक चित्रपटगृहाच्या मालकांना आणि वितरकांना आमंत्रित करून मोठा व्यवसाय मिळवून दिल्याचे श्रेय देत त्यांना ट्रॉफी देत असत. यशराज फिल्मचा मालक आदित्य चोप्राने ही परंपरा पुन्हा ‘धूम-3’च्या माध्यमातून जिवंत ठेवण्याचा प्रयत्न केला आहे.
‘धूम-3’ने 275 कोटींचा व्यवसाय केल्याबद्दल आदित्य चोप्राने अलीकडेच यशराज स्टुडिओत भव्य पार्टी दिली. त्याने जुन्या पद्धतीला पुन्हा चालना देत चित्रपटगृहांचे मालक आणि चित्रपट व्यवसायाशी संबंधित लोकांना आमंत्रण दिले होते. मात्र, तो स्वत: या पार्टीत अनुपस्थित होता. अशा वेळी आमिर खान आणि आदित्यचा सहकारी आशिष सिंगने पार्टी सांभाळून पाहुण्यांची भेट घेतली.
पुढे वाचा, पाहुण्यांनी दबक्या आवाजात केली आदित्यबाबत...