आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aamir Khan Traveled With Wife Kiran In Car Rs 10 Cr.

10 कोटींच्या कारमध्ये पत्नीला लाँग ड्राइव्हवर घेऊन गेला आमिर, पाहा PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानला काल (3 मार्च) बांद्रामध्ये त्याची नवीन कार चालवताना बघितले गेले. यादरम्यान आमिरसोबत त्याची पत्नी किरण रावसुध्दा होती. आमिरची नवीन कार बुलेटप्रुफ आणि बॉम्बप्रुफ आहे. ही कार मर्सिडीज बेंजची खास मॉडेल आहे. आमिरच्या या कारची किंमत 10 कोटी रुपये सांगितली जात आहे. त्याच्या या महागडया कारचा नंबर ‘MH.02.DJ.7’ आहे. कार चालवण्याच्या दरम्यान आमिरने डोक्यावर टोपी घातलेली होती. सोबतच, त्याने त्याचा आवडता काळ्या रंगाचा टी-शर्ट घातलेला होता.
सुत्राच्या सांगण्यानुसार, आमिर देशातील असा तिसरा व्यक्ती आहे, ज्याच्याजवळ ही कार आहे. आतापर्यंत पंतप्रधान मनमोहनसिंह आणि उद्योगपती मुकेश अंबानीच अशी कार वापरत होते. आता आमिरचाही यांचामध्ये सामावेश झाला आहे. बुलेटप्रुफ कार अनेक लोकांजवळ आहे. परंतु बॉम्बप्रुफ कार फक्त काही खास व्हीआयपी लोकांसाठीच बनवली जाते.
आमिर एका पंचतारांकित हॉटेलमध्ये पार्टी करत होता तेव्हा त्याला पहिल्यांदा या कारमध्ये पाहिले होते.
का खरेदी केली 10 कोटींची बॉम्बप्रुफ कार?
सुत्रांकडून सांगितल्याप्रमाणे, आमिरच्या 'सत्यमेव जयते' या कार्यक्रमाच्या पहिल्या पर्वात स्त्री भ्रूण हत्या, ऑनर किलिंग यांसारख्या गंभीर विषयांवर भाष्य करण्यात आले होते. त्यानंतर त्याला धमकी मिळाली होती. त्याने त्याची तक्रार पोलिस स्टेशनमध्ये केली होती. पोलिसांनी त्याला सुरक्षाही दिली होती. परंतु आपल्या काही जवळच्या मित्रांच्या आणि कुटुंबीयांच्या सांगण्यावरून त्याने ही कार खरेदी केली आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा आमिरच्या 10 कोटी रुपयांच्या कारची छायाचित्रे...