आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aamir Khan Will Release His Film Peekey In December

आमिरने \'पीके\'च्या रिलीजची तारीख बदलल्याने शाहरुख-जॉन अडचणीत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
आमिरने त्याचा 'पीके' सिनेमा जूनमध्ये प्रदर्शित करण्याऐवजी ख्रिसमस काळातील नेहमीची तारीख बुक केली आहे. यामुळे 2014 मधील सर्व मोठय़ा सिनेमांना आपले वेळापत्रक बदलावे लागले. शाहरुखचा 'हॅपी न्यू इयर' आणि जॉन अब्राहमचा 'वेलकम बॅक' दोन्हीही दिवाळीच्या मुहूर्तावर प्रदर्शित होण्याची शक्यता आहे.
2012 मध्ये दिवाळीत 'सन ऑफ सरदार'ने अजय देवगण आणि शाहरुख खान यांच्यातील कटुता वाढवली. शिवाय यशराज, शाहरुख आणि काजोल यांच्यातील संबंधही तुटले. एकता कपूरने ऑगस्ट 2013 मध्ये 'चेन्नई एक्स्प्रेस'सोबत प्रदर्शनाच्या तारखेचा वाद घातला तेव्हा शाहरुखच्या सिनेमाने 'वन्स अपॉन अ टाइम इन मुंबई दोबारा' या सिनेमाचे तीनतेरा वाजवले.
आता आमिरने या वर्षीच्या आपल्या वेळापत्रकात बदल केला आहे. त्याचा 'पीके' जूनच्या पहिल्या आठवड्यात प्रदर्शित होणार होता. मात्र, यामध्ये आमिरने बदल करत हा सिनेमा 2014 च्या ख्रिसमसला प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे इतर मोठय़ा चित्रपटांमध्ये प्रदर्शनाची योग्य तारीख शोधण्यावरून गोंधळ उडाला आहे.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या आता कसे असणार सिनेमे रिलीज होण्याचे वेळापत्रक...?