आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aamir Khan\'s Life Under Threat; Actor Buys Rs 10 Cr Bombproof Car

आमिरने खरेदी केली 10 कोटींची बुलेटप्रूफ कार, देशात केवळ तीनच व्यक्तिंकडे आहे ही कार

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलिवूडचा मिस्टर परफेक्शनिस्ट आमिर खानने अलीकडेच एक बुलेटप्रूफ कार खरेदी केली आहे. ही कार खास सुरक्षेच्या कारणास्तव खरेदी केल्याचे सांगितले जात आहे. मर्सिडीज बेंजच्या महागड्या कारपैकी ही एक आहे. या कारवर गोळीबार किंवा बॉम्ब हल्ल्याचा परिणाम होत नाही.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आमिरने अलीकडेच ही कार खरेदी केली असून तो सध्या यातूनच बाहेर फिरताना दिसतो. आमिरच्या या नवीन गाडीचा मॉडेल मर्सिडीज बेंज S600 आहे. या कारची किंमत जवळपास दहा कोटी एवढी सांगितली जात आहे. ही कार खरेदी करणारा आमिर देशातील तिसरी व्यक्ति ठरला आहे. पहिली कार देशाचे पंतप्रधान मनमोहनसिंह यांच्याकडे आहे, तर दुसरी कार बिझनेसमन मुकेश अंबानी यांच्याकडे आहे. आता तिसरी कार आमिरकडे आहे.
सुत्रांकडून सांगितल्याप्रमाणे, आमिरच्या 'सत्यमेव जयते' या कार्यक्रमाच्या पहिल्या पर्वात स्त्री भ्रूण हत्या, ऑनर किलिंग यांसारख्या गंभीर विषयांवर भाष्य करण्यात आले होते. त्यानंतर त्याला धमकी मिळाली होती. आता 2 मार्चपासून सत्यमेव जयतेचे दुसरे पर्व सुरु होत आहे. या पर्वात शासन, भ्रष्टाचार याविषयांवर प्रकाश टाकण्यात येणार आहे. अशात वाईट लोक नुकसान पोहोचवू शकतात, याची कल्पना आमिरला आहे.
विशेष म्हणजे याचकारणामुळे आमिरच्या आई घाबरल्या आहेत. गेल्या वेळी कार्यक्रमाच्या अनेक मुद्दय़ांबाबत अनेक संघटना आणि लोकांनी आक्रमक पद्धतीने आमिर खानचा विरोध केला होता. तेव्हापासूनच आमिरच्या 80 वर्षांच्या आईच्या मनात काही तरी अनुचित घटना घडणार असल्याची भीती निर्माण झाली आहे. आता दुसरा सीझन सुरू होत असल्यामुळे ती आणखीनच घाबरल्या आहेत. त्यामुळे आमिरने त्यांची भीती दूर करण्यासाठी पुढाकार घेतला आणि बुलेटप्रूफ कार खरेदी केली.