आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

दीड वर्षांची आराध्या आता जाणार शाळेत !

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

ऐश्वर्या राय बच्चन आणि अभिषेक बच्चनची लाडकी लेक आराध्या आता शाळेत जाणार आहे. दीड वर्षांची आराध्या नुकतीच आपल्या आईबरोबर लंडनहून परतली आहे. आता ऐकिवात आहे की, बच्चन कुटुंबीय तिच्यासाठी चांगल्या शाळेचा शोध घेत आहेत.
आराध्या यापूर्वी आयपॅड चालवणे आणि खूप सहजपणे गायत्री मंत्राचे उच्चारण करत असल्यामुळे चर्चेत आली आहे. आराध्याचे आजोबा अमिताभ बच्चन यांनी स्वतः याचा खुलासा केला होता.
आता एका प्रसिद्ध वृत्तपत्राने प्रकाशित केलेल्या बातमीनुसार, आराध्या आता शाळेत जाणार आहे. सध्या शाळेच्या प्रवेशप्रक्रिया सुरु आहेत. त्यामुळे बच्चन कुटुंबीय आराध्यासाठी चांगल्या प्ले स्कूलचा शोध घेत आहेत. जेणेकरुन आराध्या इतर मुलांबरोबर नवीन गोष्टी शिकू शकेल.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा आराध्याची खास छायाचित्रे...