आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

Install App

ADS Free बातम्या वाचण्यासाठी आताच इंस्टॉल करा दिव्य मराठी अ‍ॅप

अंबानींच्या पार्टीत अभि-अ‍ॅशमध्ये कडाक्याचे भांडण, बच्चन कुटुंबीयांनी ठेवला एकमेकांपासून दुरावा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
काही दिवसांपूर्वी अशी बातमीसमोर आली होती, की ऐश्वर्याला तिच्या सासू-सासर-यांसोबत राहण्याची इच्छा नाहीये. कारण तिला तिच्या भविष्याच्या योजनेमध्ये जया बच्चन यांची बंधने आवडत नाहीत. परंतु ही बातमी अमिताभ आणि अभिषेक यांना कळताच त्यांनी ही अफवा असल्याचे सांगितल्यानंतर सर्व चर्चा बंद झाल्या होत्या.
परंतु आज एक रंजक गोष्ट समोर आली आहे, जी ऐकून तुम्ही ही थक्क व्हाल. अलीकडेच एका पार्टीत अभिषेक-ऐश्वर्या यांनी उपस्थिती लावली होती. तिथे चक्क दोघांचे सर्वांसमोर भांडण झाले. सुत्रांच्या सांगण्यानुसार, आपापसांतील भांडणामुळे दोघे खूपच गंभीर आणि उदास दिसत होते. मुंबईच्या परेड परिसरातील अनिल अंबानी यांच्या करोबारी या घरी अंबानी भावंडांनी आई कोकिलाबेन यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी रात्री ही पार्टी आयोजित केली होती.
या पार्टीत बॉलिवूडचे अनेक स्टार्स सामील झाले होते. या पार्टीत अभिषेक आणि ऐश्वर्या यांच्यामध्ये झालेल्या वादाच कारण अद्याप कळू शकलेले नाही. परंतु इंटनेटवर आलेल्या छायाचित्रांकडे बघून या बातमीची स्पष्टता दिसून येते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या अभिषेक आणि ऐश्वर्याच्या वादाविषयी अधिक माहिती...