आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Abhishek Bachchan And Aishwarya Rai Snapped In Bhopal

साडभावाच्या मुलाच्या लग्नात सहभागी झाले बिग बी, ब-याच दिवसांनी जया-ऐश्वर्या दिसल्या सोबत

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
भोपाळ - सुपरस्टार अमिताभ बच्चन गुरुवारी आपल्या संपूर्ण कुटुंबाबरोबर एका लग्नात सहभागी होण्यासाठी भोपाळला गेले होते. 5 डिसेंबर रोजी बिग बी यांचे साडभाऊ राजीव वर्मा यांच्या मुलाचे लग्न होते. भोपाळमधील भदभदा रोड स्थित ग्रीन वुड्स कंट्री क्लबमध्ये हा विवाहसोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी वरातीत बिग बींनी अभिषेक आणि जया बच्चनसह ताल धरला.
वधू-वराच्या सप्तपदी झाल्यानंतर ऐश्वर्या राय बच्चन आराध्यासह विवाहस्थळी पोहोचली. तेव्हा सर्वांच्या नजरा दोघींवर खिळल्या. विशेष म्हणजे या लग्नाच्या निमित्ताने जया आणि ऐश्वर्या ब-याच दिवसांनी एकत्र दिसल्या. खरं तर या दोघींमध्ये सध्या खटके उडत असल्याच्या बातम्या आहेत. मात्र नातेवाईकाच्या लग्नात या दोघीही रुसवे-फुगवे सोडून एकत्र आल्या.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा बच्चन कुटुंबीयांची खास छायाचित्रे...