आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐश्वर्याने दिली अभिषेकला सरप्राईज बर्थ डे पार्टी, पाहा कोणकोणते सेलेब्स पार्टीत झाले होते सहभागी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलिवूडचे मेगास्टार अमिताभ बच्चन यांचा मुलगा आणि बॉलिवू़ड अभिनेता अभिषेक बच्चनने बुधवारी आपला 38वा वाढदिवस साजरा केला. आपल्या वाढदिवशी अभिषेक दिवसभर त्याच्या आगामी सिनेमाच्या शुटिंगमध्ये बिझी होता. मात्र संध्याकाळी घरी परतल्यानंतर त्याला पत्नी ऐश्वर्याकडून एक सरप्राईज मिळाले. ऐश्वर्याने आपल्या पतीसाठी एक खास सरप्राईज बर्थ डे पार्टी आयोजित केली होती.
या पार्टीत नातेवाईकांसह बॉलिवूडमधील प्रसिद्ध चेहरे सहभागी झाले होते. ऐश्वर्याच्या पाहुण्यांच्या यादीत शाहरुख खान, फराह खान, मनीष मल्होत्रा, करण जोहरसह ब-याच सेलिब्रिटींचा समावेश होता.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला अभिषेकच्या या बर्थ डे पार्टीत सहभागी झालेल्या स्टार्सची छायाचित्रे दाखवत आहोत. पुढील स्लाई‍ड्सवर क्लिक करुन पाहा कोणकोणते स्टार्स अभिषेकला बर्थ डे विश करायला पोहोचले होते...