आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Abhishek Bachchan, Shah Rukh Khan, Shyam Benegal Attend Megha Namdeo’s Wedding Reception

गोविंद नामदेव यांच्या मुलीच्या WEDDING RECEPTION मध्ये सहभागी झाले शाहरुख, अभिषेक

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड अभिनेते गोविंद नामदेव यांची मुलगी मेघा नामदेव हिचा अलीकडेच शुभविवाह झाला. यानिमित्ताने त्यांनी मुलगी मेघा आणि जावई राजीव यांच्यासाठी ग्रॅण्ड वेडिंग रिसेप्शन पार्टी आयोजित केली होती. या पार्टीत बी टाऊनमधील अनेक कलाकारांनी हजेरी लावून नवदाम्पत्याला आशीर्वाद आणि शुभेच्छा दिल्या.
रिसेप्शन पार्टीत सर्वप्रथम हजेरी लावली ती अभिषेक बच्चनने. तर अभिनेता शाहरुख खानसुद्धा आपल्या बिझी शेड्युलमधून वेळ काढत येथे पोहोचला होता. अहाना देओलच्या लग्नात शाहरुख स्टिकच्या मदतीने चालत आला होता. मात्र आता शाहरुख पूर्णपणे बरा झाला असून मेघाच्या रिसेप्शन पार्टीत अगदी फिट दिसला.
भोजपूरी अभिनेता रवी किशन पत्नी प्रीतिसह पार्टीत सहभागी झाला होता. तर श्याम बेनेगल, जॉनी लिव्हर, हिमानी शिवपुरी यांनीही पार्टीला हजेरी लावून नवदाम्पत्याला आशीर्वाद दिला.
बॉलिवूडकरांसह छोट्या पडद्यावरील कलाकारसुद्धा रिसेप्शन पार्टीत दिसले. यामध्ये अभिनेता यश टोंक पत्नी गौरीसह येथे दिसला.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पाहा वेडिंग रिसेप्शनचा हा खास अल्बम...