आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Abhishek Bachchan & Virat Kohli To Unveil Jerseys Of The Charity Football Mtach In The Capital

अभिषेक बच्चन आणि विराट कोहली करणार फुटबॉल मॅचची जर्सी लाँच

10 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

'ऑल स्टार्स फुटबॉल क्लब'च्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या चॅरिटी फुटबॉल मॅचचे कर्णधार अभिषेक बच्चन आणि विराट कोहली 20 मार्चला आपल्या टीमची जर्सी आणि ट्रॉफी लाँच करणार आहेत.
चॅरिटीसाठी फंड गोळा करण्यासाठी ही फुटबॉल मॅच आयोजित करण्यात आली असून येत्या 30 मार्चला पहिला फुटबॉल सामना खेळला जाणार आहे. अभिषेक बच्चन आणि विरोट कोहलीच्या टीममध्ये हा पहिला सामना खेळला जाणार आहे.
ए. एस. एफ. सी (ऑल स्टार्स फुटबॉल कल्ब)चे आयोजक बंटी वालिया यांनी सांगितले की, ''दोन्ही टीमचे कर्णधार अभिषेक आणि विराट 20 मार्चला दिल्लीत फुटबॉल मॅचची जर्सी लाँच करतील. सगळे खेळाडू आणि या क्लबशी जुळलेले सगळेजण उत्साहित असून आमचा प्रयत्न यशस्वी होईल अशी आम्हाला आशा आहे.''