आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जीममध्ये ट्रेडमिलवर धावता धावता अभिनेता अबीर गोस्वामी यांचे निधन

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


छोट्या आणि मोठ्या पडद्यावर आपल्या अभिनयाची छाप सोडणारा अभिनेता अबीर गोस्वामी यांचं 31 मे रोजी निधन झालं. वयाच्या अवघ्या 38 व्या वर्षी त्यांचा हृदय विकाराने मृत्यू झाला.
अबीर यांची प्रकृती उत्तम होती. शुक्रवारी ते जीमलाही गेले होते. मात्र ट्रेडमिलवर धावता धावताच त्यांना हृदय विकाराचा तीव्र धक्का आल्याने, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र तिथे त्यांना मृत घोषित करण्यात आलं.

अबीर गोस्वामी जीममध्ये जवळपास ३ वर्षांपासून वर्कआऊट करण्यासाठी जात होते. शुक्रवारी जीममध्ये ट्रेडमीलवर व्यायाम करताना त्याला हृदयविकाराचा तीव्र झटका आला. यावेळी अभिनेता संदीप राजोरा त्यांच्या बरोबर होते. त्यांनी अबीरला जवळच्या रुग्णालयात दाखल केले. मात्र तेथे डॉक्टरांनी अबीर यांना मृत घोषित केले. अबीर यांना काही काळापासून हृदयविकाराचा त्रास होता. मात्र त्यांनी ही बाब जीमच्या ट्रेनरपासून लपवून ठेवली होती. अबीरच्या या आजाराबाबत संदीप राजोरा यांनाही काहीच कल्पना नव्हती. या घटनेबाबत अबीर यांच्या पत्नीला लगेच कळवण्यात आले. अबीरला हृदयविकाराचा त्रास असल्याचा खुलासा यावेळी अबीर यांच्या पत्नीने केला.


अबीर ‘कुसुम’, ‘हॉटेल किंस्टन’, ‘कुमकुम’, ‘छोटी मां’, ‘बदलते रिश्तों की दास्तान’, ‘घर आजा परदेसी’, 'एक हजारों में मेरी बहना है' या मालिकांमध्ये झळकले होते. सध्या ते ‘प्यार का दर्द है’ या मालिकेत एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसत होते. मालिकांबरोबरच 'लक्ष्य', 'द लिजेंड ऑफ भगत सिंग' आणि अनुराग कश्यपच्या आगामी 'अग्ली' या सिनेमांमध्येही महत्त्वपूर्ण भूमिका साकारल्या होत्या. अबीर यांच्या अकाली मृत्यूमुळे स्मॉल आणि बिग स्क्रीनवर हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.