आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अक्षयच्या 'Holiday'मध्ये व्यत्यय आणणार नाही अजय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अजय देवगणने काही दिवसांपूर्वी असा इशारा केला होता, की अक्षय कुमारच्या 'हॉलिडे'सोबत 6 जूनला त्याचा 'अ‍ॅक्शन जॅक्सन' सिनेमा रिलीज करणार आहे. परंतु सिनेमांचे व्यवसाय लक्षात घेता आणि बॉक्स ऑफिसच्या परिस्थितीला बघून आता तो ही तारिख रद्द करण्याचा विचार करत आहे.
एकदा अजय म्हणाला होता, की तो अक्षयच्या 'हॉलिडे'सोबत स्पर्धा करू इच्छित नाही. कारण, ते दोघेही मित्र आहेत आणि एकमेकांना टक्कर देण्याची त्यांची इच्छा नाहीये. अजय देवगणच्या समस्या इतर कारणांनी वाढल्या असून तो सिनेमाला पुढे ढकलण्याचा विचार करत आहे.
पहिले कारण आहे, 'अ‍ॅक्शन जॅक्सन' आणि 'सिंघम 2'. 'अ‍ॅक्शन जॅक्सन'ची 25 दिवसांची शुटिंग शिल्लक आहे आणि आठवड्याभरात अर्थातच 10 मार्चला 'सिंघम 2'ची शुटिंग सुरू होणारा आहे. दिग्दर्शक रोहित शेट्टी एकाच स्लॉटमध्ये शुटिंग पूर्ण करतो. म्हणून सिनेमाची रिलीज डेट 15 ऑगस्ट निश्चित झाली आहे. आता अजयने यात काहीही फेरबदल केला तर याचा सरळ परिणाम 'सिंघम 2'च्या वेळापत्रकांवर पडू शकतो.
दुसरे कारण आहे, की 'हॉलिडे'चे जगभरातील वितरण अधिकार रिलायंस स्टुडिओजवळ असून हिच कंपनी 'सिंघम 2'ची सह-निर्माती आहे. त्यामुळे आपल्याच सहकार-यासोबत अजयला स्पर्धा करायची नाहीये. तिसरे सर्वात मोठे कारण आहे, की रोहित आणि प्रभुदेवा दोघेही मसालेदार कमर्शिअल सिनेमे बनवण्यात परफेक्ट आहेत. दोन्ही सिनेमांमधून अजयला सर्वाधिक यश मिळण्याची अपेक्षा आहे. अजयच्या 'सिंघम'ने 102 कोटींचा, 'गोलमाल 3'ने 107 कोटींचा, 'सन ऑफ सरदार'ने 100 कोटींचा तर 'बोल बच्चन'ने 100 कोटींचा व्यवसाय केला होता.
सिनेमा पंडित मानतात, की 'अ‍ॅक्शन जॅक्सन' आणि 'सिंघम 2' हे दोन्ही सिनेमे 150 कोटींचा अकडा पार करू शकतात. अजयला 'सिंघम 2'च्या शुटिंग डेट्समधून 25 दिवसांचा वेळ काढून 'अ‍ॅक्शन जॅक्सन'ला देऊन सिनेमाच्या वेळापत्रकात बदल करायचा नाहीये. आतापर्यंत कोणतेही स्पष्टीकरण मिळालेले नाही परंतु एक आतील बातमी आहे, की रिलायंससोबतचे संबंध बघता आणि दोन्ही दिग्दर्शकांच्या कमर्शिअल कंटेटकडे बघता अजय 6 जून ही तारिख सोडू शकतो. 'अ‍ॅक्शन जॅक्सन'साठी दुस-या तारखेचा शोध सुरू झाला आहे. याची घोषाणाही लवकरच केली जाणार आहे.
'हीरो'मधून पंकज कपूर बाहेर आणि तिग्मांशु धुलिया आत, वाचा पुढील स्लाइड्सवर