आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराप्रसिद्ध अभिनेते फारुख शेख यांचे दुबईत हृदयविकारच्या झटक्याने निधन झाले. फारुख शेख यांच्या निधनाने चित्रपटसृष्टीला मोठा धक्का बसला आहे. ते कुटुंबियांसोबत फिरायला गेले होते.
त्यांनी अनेक दर्जेदार चित्रपट दिले. विनोद आणि संवेदनशील विषयांवर त्यांचा हातखंडा होता. नुरी, शतरंज के खिलाडी, चष्मेबद्दुर, गरम हवा इत्यादी चित्रपट गाजले. फारुख शेख यांनी 1973 मध्ये 'गरम हवा' या चित्रपटातून सिनेसृष्टीत पाऊल ठेवले होते. हा चित्रपट अतिशय गाजला होता. त्यानंतर त्यांनी अनेक हिट चित्रपट दिले. अलिकडेच ते 'ये जवानी है दिवानी' आणि 'शांघाई' या चित्रपटांमध्ये झळकले होते. त्यांनी 90 च्या दशकात मोठ्या पडद्याला दूर सारत टीव्हीकडे लक्ष केंद्रीत केले होते. सोनी वाहिनीवरील त्यांची 'चमत्कार' ही विनोदी मालिका लोकप्रिय झाली होती. याशिवाय त्यांनी स्टार प्लसवर 'जी मंत्रीजी' या कार्यक्रमातही काम केले होते. याशिवाय त्यांनी 'जीना इसी का नाम है' या कार्यक्रमाचेही सुत्रसंचालन केले होते.
Copyright © 2022-23 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.