आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेता राजपाल यादव दहा दिवसांसाठी तुरुंगात

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
नवी दिल्ली - अभिनेता राजपाल यादव याला दिल्ली हायकोर्टाने मंगळवारी 10 दिवसांच्या कैदेची शिक्षा ठोठावली. त्याची पत्नी राधाला कार्यवाही पूर्ण होईपर्यंत कोर्टात बसण्याची शिक्षा झाली.
दिल्लीचे एम.जी. अग्रवाल यांनी राजपाल यास 2010 मध्ये ‘अता पता लापता’ या चित्रपट निर्मितीसाठी 5 कोटी रुपये उसने दिले होते. त्याच्या वसुलीसाठी त्यांनी खटला भरला होता. यावर कोर्टात हजर न राहता राजपालने सोमवारी बनावट स्वाक्ष-या करून शपथपत्र सादर केले होते. न्यायालयाची दिशाभूल केल्याप्रकरणी हायकोर्टाने संताप व्यक्त केला.