आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Actor Sanjay Dutt Gets A Month\'s Parole, Says Wife Is Unwell

संजय दत्तच्‍या पॅरोलला \'मान्‍यता\' देण्‍याच्‍या निर्णयाची चौकशी करुः गृहमंत्री पाटील

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

पुणे- येरवडा तुरुंगात शिक्षा भोगत असलेला अभिनेता संजय दत्त याची 1 महिन्‍यांची पॅरोल रजा मंजूर करण्‍यावरुन प्रश्‍नचिन्‍ह उपस्थित झाले आहे. त्‍याला दोन महिन्‍यांमध्‍ये दुस-यांदा पॅरोल रजा मंजूर करण्‍यात आली आहे. या निर्णयाचा विरोध होत आहे. सर्व सामान्‍य नागरिक आणि सेलिब्रिटीजसाठी वेगळा कायदा आहे का, असा संतप्त सवाल विचारण्‍यात येत आहे. येरवडा तुरुंगाबाहेर काही लोकांनी हातात काळे झेंडे घेऊन संजय दत्त आणि तुरुंग प्रशासनाविरुद्ध निदर्शने केली. दरम्‍यान, याप्रकरणाची चौकशी करुन विधानसभेत निवेदन देऊ, असे राज्‍याचे गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी स्‍पष्‍ट केले आहे. सोमवारपासून विधीमंडळाच्‍या हिवाळी अधिवेशनाला नागपुरात सुरुवात होत आहे.

एका सर्वसामान्‍य कैद्याला पॅरोल सहज मंजूर होत नाही. ब-याच प्रयत्‍नांनंतर काही दिवसांची रजा वर्षातून एखाद्यावेळेस मिळते. तिथे संजय दत्तला दोन महिन्‍यातून दोनदा तीदेखील महिन्‍याभराची रजा मंजूर होते. त्‍यातही त्‍याने जे कारण दिले ते धादांत खोटे असल्‍याचे दिसून आले आहे. यावरुन संताप व्‍यक्त होत आहे.

माजी आयपीएस अधिकारी वाय. पी. सिंह यांनी पुण्‍याचे विभागीय आयुक्त प्रभाकर देशमुख यांच्‍या निलंबनाची मागणी केली आहे. सोशल मीडियामध्‍येही संजय दत्तला पॅरोज मंजूर केल्‍यावरुन तीव्र प्रतिक्रीया उमटत आहेत. ट्विटर आणि फेसबुकवर मान्‍यता 'आर. राजकुमार' या चित्रपटाच्‍या प्रिमिअरला जातानाचे काही फोटो शेअर करण्‍यात आले आहेत. मान्‍यताच्‍या आजारपणाचे कारण देऊन संजय दत्तने रजा मागितली होती. मान्‍यता आजारी आहे तर ती चित्रपटाच्‍या प्रिमिअरला कशी जाऊ शकते, असा सवाल उपस्थित केला जात आहे.

दुसरीकडे, 1993 च्‍या बॉम्‍बस्‍फोटांप्रकरणी संजय दत्तसोबत दोषी ठरविण्‍यात आलेल्‍या झैबुन्निसा काझी, केरसी बापजी अजदानिया, युसूफ खान, रंजीत कुमार आणि अल्‍ताफ अली यांना अद्याप एकदाही पॅरोल मंजूर करण्‍यात आलेली नाही. झैबुन्निसा यांचे वय 70 असून त्‍यांना कर्करोगासारखा गंभीर आजार झालेला आहे. संजय दत्त आणि त्‍या सोबतच तुरुंगात गेल्‍या होत्‍या. परंतु, त्‍यांना एकदाही पैरोल मिळाली नाही, तर संजय दत्तला वारंवार पॅरोल देण्‍यात येत आहे. यावरुन झैबुन्निसा यांच्‍या मुलीनेही प्रश्‍न उपस्थित केला आहे.

संजय दत्तला मिळतेय का अनावश्‍यक सवलत... वाचा पुढील स्‍लाईड्समध्‍ये..