आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Shocking : \'नि:शब्द\' फेम जिया खानची मुंबईत आत्महत्या, बिग बींसह बॉलिवूड हादरलं...

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई- 'नि:शब्द' चित्रपटात अमिताभ बच्चन तर गजनी चित्रपटात अमिर खानसोबत काम केलेल्या बॉलिवूड अभिनेत्री जिया खान हिने सोमवारी रात्री 11 वाजेच्या सुमारास स्वत:च्या ओढणीने गळफास लावून घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. 25 वर्षीय जिया जुहू येथील सागर तंरग अपार्टमेंटमध्ये तिची आई रबियासोबत राहत होती.

जियाच्या खोलीच्या छताला जियाला तिच्या आईने लटकेलेले पाहिले. त्यानंतर तिला तत्काळ रुग्णालयात हलवण्यात आले, परंतु तेथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. जियाच्या आत्महत्येमागील नेमके कारण अद्याप कळू शकले नाही. जियाच्या मृत्यूनंतर बॉलिवूडमध्ये हळहळ व्यक्त होत असून अमिताभ बच्चन याने ट्‍विटरवर शोक व्यक्त केला आहे.

सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, जिया हिने जुहू येथील सागर तंरग अपार्टमेंटमध्ये तिच्या राहत्या घरी गळपास घेऊन आत्महत्या केली. कॉर्नर कोर्ट कूपर रूग्णालयात जियाच्या मृतदेहाचे पोस्टमॉर्टम करण्यात येणार आहे. जियाच्या घरातील कामवाली, सुरक्षा रक्षक आणि शेजारी राहणार्‍या लोकांचीही चौकशी केली जाणार असल्याचे पोलिसांनी सांगितले. जियाचे फेसबुक, ट्वीटर, एएमएस आणि फोन कॉल्सच्या माध्यमातूनही चौकशी होणार असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.

23 मेचे अंतिम टि्वट...
जिया हिने 23 मे रोजी आपला शेवटचे टि्वट केले होते. त्यात तिने म्हटले होते की, 'मला माफ करा. काही काळासाठी मी टि्वटर दिसणार नाही. थोडा ब्रेक घेत आहे. जीवन जगताना अशा प्रकारचे ब्रेक घेणे खूप महत्त्वपूर्ण असतात.'

'नि:शब्द' जियाचा पहिला सिनेमा...
'नि:शब्द' या चित्रपटाच्या माध्यमातून जिया खान हिने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. सन 2007 मध्ये आलेल्या 'नि:शब्द'मध्ये बिग बी अमिताभ बच्चनसोबत तिने काम केले. रामगोपाल वर्मा याने या सिनेमाचे दिग्दर्शन केले होते.

जिया ही नफीसा खान म्हणूनही ओळखले जात होते. इंग्लंडमध्येच ती मोठी झाली होती. काही वर्षांपूर्वी ती तिची आई रबिया आणि ती मुंबईत आली होती.

जियाने 2008 मध्ये आलेल्या 'गजनी'मध्ये आमिर खानसोबतही काम केले होते. साजिद खानचा 'हाऊसफुल-2' हा जियाचा शेवटचा सिनेमा ठरला. सन 2010 मध्ये आलेल्या हाऊसफुल-2 मध्ये अक्षय कुमार,दीपिका पादुकोण,रितेश देशमुख आणि लारा दत्ता सोबत जिया खान दिसली होती.