आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेत्री जिया खानची आत्महत्या, आदित्य पंचोलीच्या मुलाची तीन तास चौकशी

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - 'नि:शब्द' या सिनेमात अमिताभ बच्चनबरोबर पहिल्यांदा रुपेरी पडद्यावर झळकलेली अभिनेत्री जिया खानने सोमवारी मध्यरात्री आपल्या राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केली. असे सांगतले जाते की, सोमवारी रात्री 11च्या सुमारास जियाचे तिच्या बॉयफ्रेंडबरोबर बोलणे झाले होते. अभिनेता आदित्य पंचोली यांचा मुलगा सुरज पंचोली हा जियाचा बॉयफ्रेंड होता. सुरजबरोबर काही वेळ जियाचे फोनवर बोलणे झाले होते. (जाणून घ्या मृत्यूपूर्वी जिया फोनवर शेवटची कुणाशी आणि काय बोलली होती ?) मात्र त्यानंतर काही वेळातच जियाच्या आईने तिला खोलीच्या छताला लटकेलेले पाहिले. (आदित्य पंचोलीचा मुलगा होता जियाचा बॉयफ्रेंड, दोन वर्षांपूर्वी वाढली होती जवळीकता !)

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, जिया जुहूतील सागर तरंग अपार्टमेंटमध्ये आपल्या आईबरोबर राहात होती. याच घरात तिने गळफास घेऊन आत्महत्या केली. जियाला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. मात्र तिथे डॉक्टरांनी तिला मृत घोषित केले. (जियाच्या मृत्यूची बातमी कळताच तिच्या घरी पोहोचले बॉलिवूड कलाकार)
जियाने आत्महत्या का केली, याचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. पोलिस पुढील तपास करत आहेत. कॉर्नर कोट कूपर हॉस्पिटलमध्ये जियाच्या मृतदेहाचे आज शवविच्छेदन करण्यात येणार आहे.
सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, पोलिसांना कोणतेही सुसाईट नोट मिळालेले नाहीये. पोलिस या प्रकरणात घरच्यांची चौकशी करत आहे. पोलिस जियाच्या घरी काम करणारी मोलकरीण, वॉचमॅन, शेजारी आणि गेल्या काही दिवसांत जियाला भेटलेल्या व्यक्तिंची चौकशी करणार आहेत.

सखोल चौकशी करत आहेत पोलिस
या संपूर्ण प्रकरणाची पोलिस सखोल चौकशी करत आहेत. पोलिसांनी जियाचे फेसबूक, ट्विटर, एसएमएस आणि फोन कॉल्स तपासत आहेत. या माध्यमातून काही तरी माहिती समोर येईल, अशी आशा पोलिसांना आहे. सध्या प्रथमदर्शनी हे प्रकरण खूपच गुंतागुंतीचे वाटत आहे आणि पोलिस त्याचा तपास करत आहेत.

आईने सांगितले डिप्रेशनमध्ये होती जिया... (दार उघडताच छताला लटकलेल्या अवस्थेत दिसली जिया, आई पडली बेशुद्ध)

जिया खानच्या आईने दिलेल्या माहितीनुसार, जिया गेल्या काही महिन्यांपासून नैराश्येत होती. गेल्या तीन वर्षांपासून जियाला बॉलिवूडमध्ये काम मिळणे बंद झाले होते. हेच तिच्या नैराश्येचे कारण होते. जियाचा शेवटचा सिनेमा 2010 साली रिलीज झाला होता. तेव्हापासून ती कामाच्या शोधात होती. जियाचे सिनेमांसाठी ऑडीशन्स देणे सुरु होते, मात्र तिला त्यात यश मिळत नव्हते. त्यामुळे ती खूपच निराश झाली होती. (बघा वयाच्या 25 वर्षी मृत्यूला कवटाळणा-या जियाची न पाहिलेली छायाचित्रे)

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या जियाच्या आत्महत्येमागचे गुढ काय असू शकते...

(जियाचा प्रवास बघण्यासाठी या लिंकवर क्लिक करा...)

(जियाचा रुपेरी पडद्यावरील प्रवास बघा...)