आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Actress Payal Rohatgi\'s Engaged Boyfriend Sangram, Will Marry In November

अभिनेत्री पायल रोहतगीने बॉयफ्रेंड संग्रामसोबत केला साखरपुडा, नोव्हेंबरमध्ये चढणार बोहल्यावर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - बॉलिवूड अभिनेत्री पायल रोहतगीने तिचा बॉयफ्रेंड संग्रामसिंह सोबत साखरपुडा केला. गुरुवारी शिवरात्रीच्या शुभ मुहूर्तावर संग्रामसह साखरपुडा केल्याची बातमी पायलने आपल्या चाहत्यांना ट्विटरवरुन दिली. 29 वर्षीय पायलने ट्विट केले, ''आज शिवरात्रीचा सण आहे. आजच्या दिवशी मी संग्रामसिंह सोबत साखरपुडा केला. भगवान शिवचे धन्यवाद. तुमचा आशीर्वाद नेहमी माझ्या पाठिशी असो.''
पायल आणि संग्राम गेल्या दोन वर्षांपासून एकत्र आहेत. यावर्षी नोव्हेंबर महिन्यात या दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. या दोघांचा साखरपुडा अहमदाबाद येथील पायलच्या घरी झाला.
पायल आणि संग्रामची पहिली भेट 'सर्व्हायवर इंडिया' या रिअॅलिटी शोच्या सेटवर झाली होती. 2012 पासून हे दोघे सोबत आहेत. 'व्हॅलेंटाइन नाइट' या सिनेमात हे दोघे एकत्र झळकले होते.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या कोण आहे संग्रामसिंह आणि सध्या तो काय करतोय?