आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अभिनेत्री सुचित्रा सेन यांचा एकांतवास रहस्यच राहणार, बघा अंत्य संस्काराची छायाचित्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
कोलकाता - गतकाळातील प्रसिद्ध अभिनेत्री सुचित्रा सेन (83) यांच्यावर शुक्रवारी अंत्य संस्कार करण्यात आले. सुचित्रा सेन यांची तुलना नेहमी हॉलीवूड स्टार ग्रेटा गारबो यांच्याशी केली जायची. कारण या दोघींनीही त्यांचे आयुष्य एकांतवासातच घालवले. 1978 नंतर काहीच लोक सुचित्रा सेन यांना भेटू शकले होते. याच एकांतवासामुळे सेन यांनी दादासाहेब फाळके पुरस्कारही नाकारला होता, असे म्हटले जाते. अंत्ययात्रा आणि र्शद्धांजलीच्या कार्यक्रमावेळीही त्यांचा चेहरा फुलांनी झाकोळला गेला होता.
मागील 35 वर्षांमध्ये त्यांना पाहू शकणार्‍यांची संख्या अत्यल्प होती. त्यामुळे त्या कशा दिसायच्या, हा प्रश्नही एक रहस्यच राहील. दिग्दर्शिका अपर्णा सेन यांना सुचित्रा सेन यांच्या एकांतवासाच्या जीवनावर एक डॉक्युमेंट्री बनवायची होती, परंतु यासाठी त्यांना परवानगी मिळू शकली नाही.
सुचित्रा सेन यांच्या अंत्ययात्रेत बरेच लोक सामील झाले होते. त्यांना 21 बंदुकांनी सलामी देण्यात आली. त्यांना श्रद्धांजली देण्यासाठी पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी पोहोचल्या होत्या. सुचित्रा सेन यांचे शुक्रवारी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले होते.
पुढील स्लाईड्समध्ये पाहा सुचित्रा सेन यांच्या अंत्य संस्काराची छायाचित्रे...
(फोटो - अंत्य संस्कारात सामील झालेले लोक)