आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

भारतीय मानसिकतेत वसलेली ठुमरी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
‘डेढ इश्किया’ मध्ये संगीतकार विशाल भारद्वाज आणि गीतकार गुलजार यांनी चित्रपटाची सांस्कृतिक पार्श्वभूमीनुसार ‘हमरी अटरिया पर आजा रे सांवरिया’ ही ठुमरी वापरली. मात्र त्यांनी लखनऊचे नवाब अली शहा यांचे आभार मानले नाही, कारण त्यांच्या दरबारातील ही रचना आहे. शिवाय बेगम अख्तर यांनाही आदरांजली दिली नाही, ज्यांची यावर्षी शंभरावी जयंती साजरी केली जात आहे. त्यांनी ही ठुमरी आपल्या आवाजात गायली होती. अनेक गायकांनी ही ठुमरी आपल्या आवाजात गायली मात्र ती बेगम अख्तरच्या नावानेच ओळखली जाते. या रचनेचा वापर ‘डेढ इश्किया’ मध्ये करणे गरजेचे होते. ही ठुमरी ऐकून अनेक लोक जुन्या ठुमरीविषयी आकर्षित झाले आहेत.
हा चित्रपटांचा प्रभाव म्हणावा लागेल की, त्यात वापरल्या गेलेल्या पारंपरिक रचनेविषयी सामान्य माणसाची आवड निर्माण होते. चित्रपटात दाखवलेल्या ठुमरीच्या काही ओळीत बदल करण्यात आला आहे. मात्र बदल केल्यामुळे कोणालाही सृजनकर्त्याचा हक्क मिळत नाही. अशा प्रकारची माकडचेष्टा तर चित्रपटातील पात्र खालू जान आणि बब्बन यांच्याप्रमाणे आहे. कारण ते हेराफेरी करण्यात नंबर वन असतात. हा लेख लिहिताना मला योगेश पवार यांचे आभार मानावे लागेल, नाहीतर मीदेखील भारद्वाज आणि गुलजारप्रमाणे होईल. बारा तारखेच्या मुंबईहून प्रकाशित डीएनए वर्तमानपत्रात या विषयावर त्यांनी माहितीपूर्ण लेख लिहिला होता. त्यांना मी नमस्कार करतो.
चित्रपटात ठुमरीचा वापर दशकापासून होत आला आहे. के. एल. सहगलच्या स्ट्रीट सिंगरमधील गाणे ‘बाबुल मोरा मैहर छूटो जाय’ मैलाचा दगड ठरले आहे. दिग्गज गुलाम अली खान यांची ‘मुगले आजम’ मधील ठुमरी ‘प्रेम जोगन बनके’ संपूर्ण देशाच्या मनात घुमत राहील. नौशाद यांनी गुलाम अली खान साहेबांना विनंती करून या गाण्यासाठी तयार केले होते. त्यांचा होकार मिळाल्याने उत्साहित होऊन के. आसिफ यांनी खानसाहेबांना दहा हजार रुपये दिले होते. 1958 मध्ये ही रक्कम एवढी मोठी होती की, यापासून एक घर विकत घेतले जाऊ शकत होते. या रुपयापेक्षा जास्त श्रेय आसिफ यांना गाण्याचे चित्रीकरण अत्यंत कल्पनाशीलता आणि संवेदनेने केले यासाठी द्यायला हवे. दिलीप कुमार आणि मधुबाला यांच्यावर चित्रित या गाण्यात खरे प्रेम दिसून येते. ‘मुगले आजम’ 5 ऑगस्ट 1960 रोजी प्रदर्शित झाला होता. मात्र गाणी दोन किंवा तीन वर्षांपूर्वी रेकॉर्ड करण्यात आली होती.
लता मंगेशकर यांनी मदन मोहन यांची ठुमरी ‘नैनों में बदरा छाये’ ‘मेरा साया’ साठी गायले होते. ही एक अमर रचना आहे. परवीन सुल्ताना यांची ठुमरी ‘कौन गली गए श्याम’ ‘पाकिजा’ मध्ये घेण्यात आली होती.
बिरजू महाराज यांना ‘मुगले आजम’ मधील गाणे ‘मोहे पनघट’ च्या चित्रीकरणासाठी आमंत्रित करण्यात आले होते. तेव्हा आपल कलावंत कुटुंबातील ज्येष्ठांचे स्मरण केले ज्यांनी नवाब वाजिद अली शहाच्या दरबारमध्ये या नृत्याच्या सादरीकरणात वाजिद अली शहासोबत सहकार्य केले होते. मुस्लिम नवाब वाजिद अली शहा यांच्या दरबारात ‘मोहे पनघट’ गीत सादर होणे गंगा जमुनी संस्कृतीचे प्रमाण आहे. आज राजकीय स्वार्थामुळे फाळणी करणार्‍यांना ठुमरी आणि त्या थोर संस्कृतीच्या गोष्टी कळू शकणार नाहीत.
‘डेढ इश्किया’ आपल्याला त्या संस्कृतीची ओळख करून देतो. त्यासाठी अभिषेक चौबे, भारद्वाज आणि गुलजार यांचे आभार. मात्र त्यांनी बेगम अख्तर आणि नवाब वाजिद अली शहा यांना आदर दिला असता तर चांगले झाले असते. खरं तर, या गोष्टीमुळे कोणाला अंतर पडते.