आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

\'आशिकी 2\'मध्ये आदित्य-श्रद्धाची सिझलिंग केमिस्ट्री

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

90 च्या दशकात एका रात्रीत स्टार बनलेल्या राहुल रॉय आणि अनु अग्रवाल यांच्या गाजलेल्या 'आशिकी' सिनेमाचा सिक्वेल लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. भूषण कुमार 'आशिकी'चा सिक्वेल 'आशिकी 2' घेऊन येत आहेत. त्यांच्या या मोस्ट अवेटेड सिनेमासाठी ऑनलाईन ऑडिशन्स घेण्यात आल्या होत्या. अखेर आदित्य रॉय कपूर आणि श्रद्धा कपूरला या सिनेमासाठी फायनल करण्यात आले आहे.

लंडन ड्रीम्स, अ‍ॅक्शन रिप्ले आणि गुजारिश या सिनेमांमध्ये आपण यापूर्वी आदित्यला बघितले आहे. तर श्रद्धा अभिनेता शक्ति कपूर यांची मुलगी आहे.

हा सिनेमा किशन कुमार आणि मुकेश भट्ट प्रोड्युस करत आहेत. तर मोहित सुरीने या सिनेमाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळली आहे. या सिनेमाचे संगीत कर्णमधूर असून याचे श्रेय जीत गांगुली आणि अंकित तिवारी यांना जाते.

'आशिकी'प्रमाणेच या सिनेमातही म्युझिकल ट्रीट प्रेक्षकांना मिळेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे. या सिनेमात तब्बल दहा गाणी असणार आहेत. अलीकडेच या सिनेमाचा एक मिनिटांचा ट्रेलर युट्यूबवर अपलोड करण्यात आला असून आत्तापर्यंत एक लाख वेळापेक्षा हा ट्रेलर बघितला गेला आहे. येत्या मे महिन्यात आशिकी 2 हा रोमँटिक सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

चला तर राहुल रॉय आणि अनु अग्रवाल यांच्याप्रमाणे सिद्धार्थ आणि श्रद्धाला हा सिनेमा एका रात्रीत स्टार बनवणार का आणि हा सिनेमा प्रेक्षकांच्या पसंतीला उतरणार का हे पाहुया.