आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • ADITYA PANCHOLI PAYING CAMERA GUYS MONEY TO LEAVE HIM ALONE

आदित्यने पहिले मीडियाशी केले भांडण, नंतर पैसे देऊन प्रकरण मिटवण्याचा केला प्रयत्न

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड अभिनेत्री जिया खानवर बुधवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी जियाच्या अंत्ययात्रेत सहभागी होण्यासाठी जाताना आदित्य पांचोलीची मीडियाशी बाचाबाची झाली. यावेळी मीडियाच्या ट्रायपॉडवर गाडी चालवून आदित्य पांचोलीने मीडियावर आपला राग काढला. आदित्य आणि काही मीडिया प्रतिनिधींमध्ये काही वेळ तू-तू, मैं-मैं झाली. मात्र काही वेळाने आदित्य सांताक्रूज दफनभूमीकडे निघून गेला.
यादरम्यान आदित्यला मीडियाने घेरले होते. प्रकरण शांत करण्यासाठी आदित्यने कॅमेरामन्सला पैसेही देण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी आदित्यची छायाचित्रे कॅमे-यात बंदिस्त झाली.
पुढे बघा ही छायाचित्रे...