आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • After Anushka, Ranveer Singh Gets Intimate With Sonakshi, Deepika

PHOTOS : अनुष्का, दीपिका, सोनाक्षीबरोबर इंटीमेट झालाय रणवीर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

रणवीर सिंहने आपल्या आत्तापर्यंतच्या करिअरमध्ये तीन मोठ्या बॅनरबरोबर काम केले आहे. रणवीरचे तिन्ही बॅनरबरोबरचे सिनेमे यशस्वी ठरले. रणवीरला त्याच्या सर्व सिनेमांमध्ये बॉलिवूडच्या आघाडीच्या अभिनेत्रींबरोबर काम करण्याची संधी मिळाली.
रणवीरने आपल्या रफ लूक्स आणि चार्ममुळे अल्पावधीतच बॉलिवूडमध्ये यशोशिखर गाठले आहे. 'बॅड बाजा बारात' या सिनेमात रणवीर पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर अवतरला. या सिनेमातील अनुष्का शर्माबरोबरची रणवीर केमिस्ट्री लाजवाब होती. त्यानंतर 'लेडीज वर्सेस रिकी बहल' या सिनेमात रणवीरला अनुष्का आणि परिणीतीबरोबर रोमान्स करायला मिळाला. तर नुकत्याच रिलीज झालेल्या 'लुटेरा'मध्ये रणवीर आणि सोनाक्षीची केमिस्ट्री प्रेक्षकांना बघायला मिळत आहे. शिवाय लवकरच 'किल दिल' या सिनेमात रणवीरची पुन्हा एकदा परिणीतीबरोबर जोडी जमणार आहे.
याशिवाय आगामी 'रामलीला'मध्ये रणवीर दीपिकाबरोबर स्क्रिन शेअर करणार आहे. खरं तर पडद्यावर रोमान्स करण्यापूर्वी रणवीर आणि दीपिकाबरोबरचे रिअल लाईफमधील रोमान्सचे किस्सेही चांगलेच गाजत आहे. एका डिनर पार्टीत रणवीर दीपिकाला सर्वांसमोर किस करताना दिसला होता.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा सिल्व्हर स्क्रिनवर आघाडीच्या अभिनेत्रींबरोबर कशाप्रकारे रोमान्स करतो रणवीर...