आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • After Chennai Express Success Sharukh And Me Become Close Friends Rohit Shetty

‘चेन्नई एक्स्प्रेस’च्या यशानंतर शाहरुख आणि माझ्या मैत्रीत वाढ - रोहित शेट्टी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मुंबई - ‘चेन्नई एक्स्प्रेस’च्या भन्नाट यशानंतर शाहरुख खान आणि माझ्या मैत्रीत खूप वाढ झाली आहे. शाहरुख आता माझ्या कुटुंबातील सदस्य असल्याचे मत दिग्दर्शक रोहित शेट्टी याने व्यक्त केले. रोहित म्हणाला, शाहरुखसोबत मैत्री झाली असली तरी बॉलीवूडमध्ये माझे पूर्वीसारखेच संबंध आहेत.
शाहरुखसोबत मैत्री झाल्याने अजय देवगणशी असलेल्या नात्यात काहीही फरक पडला नाही. अजयसोबतच माझ्या करिअरची सुरुवात झाली आहे. त्यामुळे तो माझा अतिशय जवळचा मित्र असल्याचे तो म्हणाला. 15 ऑगस्ट रोजी रोहितचा ‘सिंघम-2’ हा चित्रपट सर्वत्र प्रदर्शित होणार आहे.