झोया अख्तरच्या 'दिल धडकने दो' या आगामी सिनेमाच्या कलावंतांबाबत भरपूर बदल झाले आहेत. आधी
करीना कपूर आणि रणबीर यांना यात घेतले जाणार होते, परंतु दोघांनी पडद्यावर भाऊ-बहीण बनण्यास नकार दिला. आता बहुप्रतीक्षेनंतर रणवीर सिंह आणि
प्रियांका चोप्रा प्रमुख भूमिका साकारणार आहेत. दोघांनीही ‘गुंडे’मध्ये प्रियकर-प्रेयसीची भूमिका साकारली आहे.
'जिंदगी ना मिलेगी दोबारा' आणि 'बॉम्बे टॉकीज'नंतर झोया अख्तरचा हा सिनेमा बहीण-भावाच्या नात्यावर आधारित असल्याचे सांगितले जात आहे. रणवीर झोयासोबत हा सिनेमा करण्यास खूप उत्साही असून सिनेमात त्याचे काम सर्वांनाच आश्चर्यचकीत करणारे आहे, असे रणवीरने सांगितले आहे.
तो पुढे म्हणाला, 'झोयासोबत काम करण्यास मी खूप उत्सूक आहे. कारण मला वाटते ती सिनेमा जगातील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकांपैकी एक आहे. या सिनेमाच्या माध्यमातून मला माझ्या अभिनयचे कौशल्य दाखवण्याची संधी मिळणार आहे.' याबाबत प्रियांका म्हणाली की, पात्र वेगळ्या प्रकारचे असल्याने झोयासोबत बसून याबाबत भरपूर चर्चा केली आहे.
सिनेमात प्रियांका चोप्रा रणवीरच्या बहिणीची भूमिका साकारणार आहे. इतर भूमिकेत अनुष्का शर्मा आणि फरहान अख्तर असणार आहे. असेही सांगितले जात होते, की सिनेमात रणवीरचा लूक गुपित ठेवण्यासाठी तिने त्याच्याकडून एक करार साइन करून घेतला आहे. त्या करारामध्ये लिहिलेले होते, की 'दिल धडकने दो'ची शुटिंग पूर्ण होऊपर्यंत तो इतर सिनेमांसोबत कोणताही करार करणार नाही.
त्याच्या एका सल्लागाराने सांगितले, की 'सिनेमाचे वेळापत्रक 90 दिवसांचे आहे. रणवीर त्यामधील एकुण 75-80 दिवसांच्या शुटिंगसाठी उपस्थित राहणार आहे.' सिनेमाची शुटिंग यूरोप, तुर्की, स्पेन, इटली आणि फ्रान्समध्ये होणार आहे.