आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

'क्वीन'नंतर आता 'दुर्गा राणी' बनणार कंगना

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडची प्रसिध्द अभिनेत्री कंगना राणावत रुपेरी पडद्यावर 'दुर्गा राणी' सिनेमाची मुख्य भूमिका साकारताना दिसू शकते. बॉलिवूड दिग्दर्शक सुजॉय घोष 'दुर्गा राणी' नावाचा एक सिनेमा तयार करण्याचा विचार करत आहे. चर्चा आहे, की या सिनेमासाठी सुजॉय विद्या बालनला निवडण्याची शक्यता आहे. परंतु काही अडचणी येत आहेत. सुजॉयने विद्याला घेऊन 'कहाणी' सिनेमा बनवला होता.
बॉलिवूडमध्ये अशीही चर्चा आहे, की सुजॉयने आता कंगना राणावतला घेऊन 'दुर्गा राणी' बनवण्याचा निर्णय घेतला आहे. तसे पाहता कंगनालासुध्दा राणी शब्द खूप आवडतो. अलीकडेच कंगनाचा 'क्वीन' रिलीज झाला असून येत्या काही दिवसांतच 'रिवाल्वर राणी' हा सिनेमासुध्दा प्रदर्शित होणार आहे.