आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • After Ranbir And Katrina, Shirtless Salman Khan Spotted With Alleged Girlfriend Iulia Vantur

कॅट-रणबीरला सोडा आणि जरा हे बघा... गर्लफ्रेंड लुलियाबरोबर सलमान फिरतोय शर्टलेस

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक


बॉलिवूडमध्ये कधी काय होईल, हे सांगता येत नाही. चमचमत्या दुनियेत सध्या सर्वच आघाड्यांवर भन्नाट यश मिळवणारा आणि आगामी सुपरस्टार संबोधित होणारा अभिनेता रणबीर कपूर आणि बेबी डॉल कतरिना कैफ यांचा रोमान्स सध्या सातव्या आसमानावर आहे. याचा प्रत्यय नुकत्याच आला असून अलीकडेच एका मासिकाने दोघांचेही अर्धनग्न छायाचित्रे प्रकाशित करून खळबळ उडवून दिली आहे. हे दोघेही आपल्या नात्याबाबत जाहीर बोलताना दिसत नसले तरी गेल्या काही महिन्यांपासून अनेकदा एकत्र फिरताना दिसत आहेत. त्यामुळे त्यांनी बोलणे टाळून एकत्र फिरून व असे छायाचित्र देऊन जगासमोर आपले प्रेम व्यक्त केल्याचे बोलले जात आहे.

तर दुसरीकडे कतरिनाचा एक्स बॉयफ्रेंड सलमान खानलासुद्धा नवीन जोडीदार गवसला आहे. रोमानियन ब्युटी लुलिया वेंचरबरोबर सलमान प्रेमाचे धडे गिरवतोय. तिकडे कॅट-रणबीर एकत्र मजा करतायत. तर इकडे सलमानसुद्धा लुलियाबरोबर वेळ घालवतोय. लुलिया आणि सलमानचे नाते अनेक दिवसांपासून स्पॉटलाईटमध्ये आले मात्र हे दोघे कधी एकत्र दिसले नव्हते. मात्र नुकतेच या दोघांना एकत्र बघितले गेले.

सलमानने लुलियाबरोबर वेळ घालवण्यासाठी एका शांत जागेची निवड केली. सलमाननेदेखील कॅमे-याच्या नजरेपासून स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. मात्र तसे होऊ शकले नाही आणि हे दोघे एकत्र कॅमे-यात बंदिस्त झाले. नुकत्याच प्रकाशित झालेल्या एका छायाचित्रात समलान लुलियाबरोबर दिसतोय.

हे दोघे लवकरच लग्न करणार असल्याची चर्चा आहे. मात्र लुलियाने या गोष्टीचा इन्कार केला आहे. असो, आता हे दोघे लग्न करणार की नाही हे तर येणा-या काळात स्पष्ट होईल. पण या छायाचित्रावरुन या दोघांमध्ये पाणी मुरतंय हे स्पष्ट झालंय.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि बघा सलमानची गर्लफ्रेंड लुलियाची काही खास छायाचित्रे..