आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

जिंकल्यानंतर आशाच्या डोळ्यात आनंदाश्रु, बघा \'नच बलिये 6\'च्या ग्रँड फिनालेचे PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
तीन महिने आपल्या धमाकेदार डान्सने प्रेक्षकांना भूरळ घालणारे ऋत्विक धनजानी आणि आशा नेगी डान्स रिअ‍ॅलिटी शोचे 'नच बलिये' विजेते ठरले आहेत. 'नच बलिये 6'च्या विजेत्याची घोषणा होताच ऋत्विक आनंदाने भारावून गेला होता आणि आशाच्या डोळ्यातून आनंदाश्रु आले होते. शोचे विजेते झाल्यानंतर ऋत्विक म्हणाला, 'आम्ही प्रत्येक एपिसोडमध्ये चांगला परफॉर्मेन्स देण्याचा प्रयत्न केला आहे. शोच्या पहिल्या दिवसापासून आम्ही आमचे ध्येय ठरवले होते, की कोणत्याही परिस्थित ही ट्रॉफी जिंकायची आहे. तशी स्पर्धाही खूप कठिण होती.'
शनिवारी 1 फेब्रुवारीला विजेते म्हणून घोषित करण्यात आलेल्या ऋत्विक आणि आशाला पुरस्काराच्या रुपात 35 लाख रुपये, 'नच बलिये'ची ट्रॉफी आणि ऑस्ट्रेलियाच्या मोफत भ्रमंतीसाठी तिकीट मिळाले आहे, सोबतच, रेनॉल्ड डस्टर एसयूव्ही कार देण्यात आली आहे. याव्यतिरिक्त कोरिओग्राफर वैभव आणि भावना यांना पुरस्काराच्या रुपात 5 लाख रुपये मिळाले आहेत.
ऋत्विक-आशाने गुरमीत-देबीना, विनोद-रक्षा आणि रिंपु-शिवांगी यांना टक्कर देत 'नच बलिये 6'ची लखलखती ट्रॉफी जिंकली आहे. 'नच बलिये'चे या पर्वामध्ये अभिनेत्री शिल्पा शेट्टी, सिनेमा निर्माता साजिद खान आणि कोरिओग्राफर टेरेंस लुईस परिक्षक होते.
'नच बलिये 6'च्या ग्रँड फिनालेच्या रात्री शोच्या परिक्षकांनी दमदार परफॉर्मेन्स दिले. सोबतच, ग्रँड फिनालेमध्ये सामील झालेले बॉलिवूड स्टार फरहान अख्तर, विद्या बालन आणि कॉमेडिअन सुनील ग्रोव्हरने या शोचा उत्साह वाढवला.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा 'नच बलिये 6' ग्रँड फिनालेची खास छायाचित्रे...