आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

पाहा अहाना देओलच्या मेंदी विधीची खास छायाचित्रे..

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
अभिनेते धर्मेंद्र आणि हेमामालिनी यांची धाकटी कन्या अहाना देओल 2 फेब्रुवारी रोजी वैभव वोरासह लग्नगाठीत अडकणार आहे. यानिमित्ताने हेमामालिनी यांच्या घरी लग्नांच्या विधीला सुरुवात झाली आहे. शुक्रवारी अहानासाठी मेंदी कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. जुहू स्थित बंगल्यात हा कार्यक्रम रंगला. यावेळी अहानाने गडद निळ्या रंगाचा लहंगा आणि हिरव्या रंगाची चोली परिधान केली होती. अहानाचा हा ड्रेस प्रसिद्ध फॅशन डिझायनर नीता लुल्ला यांनी डिझाइन केला होता. याशिवाय अहानाची आई हेमामालिनी आणि थोरली बहीण ईशाचाही ड्रेस नीता लुल्ला यांनीच डिझाइन केला होता.
मेंदीच्या विधीनंतर शनिवारी संगीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. हा कार्यक्रम मुंबईतील आयटीसी मराठा हॉटेलमध्ये रात्री नऊ वाजता आयोजित करण्यात आला आहे.
संगीत कार्यक्रमात अहाना निळ्या रंगाचा ड्रेस परिधान करणार आहे. या कार्यक्रमात ईशा देओल तिच्या गाजलेल्या 'धूम' सिनेमातील गाण्यावर ताल धरणार आहे. यासाठी ती गेल्या पंधरा दिवसांपासून प्रॅक्टिस करत आहे. संगीत सेरेमनीसाठी मनीष मल्होत्राने अहानाचा ड्रेस डिझाइन केला आहे.
आयटीसी मराठा हॉटेलमध्येच 2 फेब्रुवारी रोजी अहाना आणि वैभवचा विवाहसोहळा पार पडणार आहे. त्यापूर्वी वरमाळा घालण्याचा कार्यक्रम 2 फेब्रुवारी रोजी सकाळी इस्कॉन मंदिरात होईल. यापूर्वी अहानाची मोठी बहीण ईशाचाही वरमाळा घालण्याचा कार्यक्रम इस्कॉन मंदिरातच पार पडला होता.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला अहानाच्या मेंहदी कार्यक्रमाची खास छायाचित्रे दाखवत आहोत. पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पाहा ही खास छायाचित्रे...