आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

अहानाच्या संगीत सेरेमनीत हेमामालिनी-धर्मेंद्र यांनी धरला ताल, पाहा INSIDE PICS

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
धर्मेंद्र आणि हेमामालिनी यांची धाकटी मुलगी अहाना देओल 2 फेब्रुवारी रोजी दिल्लीतील व्यावसायिक वैभव वोरासह लग्नगाठीत अडकली. त्यापूर्वी म्हणजेच 1 फेब्रुवारी रोजी मुंबईतील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये अहानासाठी संगीत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
आहानाच्या संगीत कार्यक्रमात बी-टाऊनची चुलबुली अभिनेत्री सोनम कपूरने दमदार परफॉर्मन्स देऊन कार्यक्रमाचा अधिक उत्साह वाढवला. तर वधू अहानासुद्धा या कार्यक्रमात थिरकताना दिसली.
अहानाच्या संगीत समारंभाच्या खास मुहूर्तावर आई हेमामालिनी नेहमीसारखीच खूप आकर्षक आणि सुंदर दिसत होती. यावेळी वडील धर्मेंद्र आपल्या लाडक्या मुलीचे लाड करताना दिसले. तर हेमामालिनी यांनी ताल धरुन वातावरणात अधिक रंग भरले. धर्मेंद्र यांनीदेखील मुलीचे हट्ट पुरवत यावेळी ताल धरला होता. या संगीत कार्यक्रमात अहानाने नीता लुल्ला यांनी डिझाइन केलेला ड्रेस घातला होता.
या पॅकेजमधून आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत, अहनाच्या संगीत कार्यक्रमाच्या आतील छायाचित्रे. या छायाचित्रांमध्ये तुम्हाला अहानाच्या संगीत कार्यक्रमातील धमाल-मस्ती बघता येणार आहे.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन पाहा कसा रंगला अहानाचा संगीत कार्यक्रम...