आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aishwarya Rai, Abhishek, Amitabh Bachchan Go Out For A Family Trip Without Jaya

अभि-ऐश आणि आराध्यासह उदयपुरमध्ये सुटी एन्जॉय करतायेत बिग बी, जया बच्चन मात्र गैरहजर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
सध्या बच्चन कुटुंबात सर्व काही आलबेल नसल्याच्या बातम्या ऐकिवात आहे. सासू जया बच्चन आणि सून ऐश्वर्या राय बच्चन यांच्यात सतत खटके उडत असल्याच्या या बातम्या आहेत. या बातम्या आता अफवा नसून प्रत्यक्षात तसं घडत असल्याचं दिसून येत आहे. याचे ताजे उदाहरण म्हणजे अलीकडेच ऐश्वर्या, अभिषेक बच्चन, आराध्या अमिताभ बच्चन यांच्यासह उदयपुरमध्ये दिसले. मात्र यावेळी जया बच्चन त्यांच्यासोबत दिसल्या नाही.
खरं तर बच्चन कुटुंबीयांना एकत्र वेळ घालवणे पसंत आहे. एकत्र सण साजरे करणे असो, किंवा व्हेकेशन ट्रिपवर जाणे असो, बच्चन कुटुंब एकत्र दिसतं.
मात्र उद्यपूरमध्ये चित्र काहीसं वेगळंच दिसलं. बिग बी आपला मुलगा-सून आणि नातीसह प्रोड्युसर मित्राच्या मुलाच्या लग्नात सहभागी होण्यासाठी उदयपूरला गेले आहेत. अमिताभ यांचा हा मित्र म्हणजे 'दो अन्जाने' आणि 'नटवरलाल' या सिनेमांचा निर्माता टीटो आहे. टीटो यांनी आपल्या मुलाचे लग्न उदयपूरमध्ये केले.
आता जया बच्चन यांच्या अनुपस्थितीवरुन ऐश्वर्या आणि त्यांच्या संबंधात वितुष्ट निर्माण झाल्याचे स्पष्ट आहे, असं म्हटलं तर वावगं ठरु नये.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा उद्यपूरमध्ये क्लिक करण्यात आलेली बच्चन कुटुंबाची ही खास छायाचित्रे...