आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aishwarya Rai Accompanies Daughter Aaradhya To Play School.

मुलीसाठी शाळेत 3 तास वेळ घालवते ऐश्वर्या, प्ले स्कुलमधील प्रवेशामुळे आनंदी आहे बच्चन कुटुंबीय

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बच्चन कुटुंबाची सर्वात छोटी आणि गोंडस मुलगी आराध्या आता शाळेत जात आहे. आराध्या प्ले स्कुलमध्ये जाते. त्यामुळे बच्चन कुटुंबात सध्या आनंदाचे वातावरण आहे. आराध्याची आई बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनलासुध्दा तिच्या मुलीचा अभिमान आहे, की आराध्या प्ले स्कुलमध्ये जात आहे. ऐश्वर्या आता रोज आराध्यासोबत प्ले स्कुलमध्ये जाते. प्ले स्कुल सुटेपर्यंत ऐश्वर्या तिच्यासोबतच असते.
बॉलिवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्या जवळच्या सुत्राने सांगितले, 'आराध्या खूपच गोंडस मुलगी आहे. ती शाळेतील वातावरणात आनंदी आहे. ती प्ले स्कुलमधील मुलांसोबत लवकर ओळख निर्माण करते. परंतु ऐश्वर्या प्ले स्कुलमध्ये आराध्याला स्वत:पासून जास्त दुर राहू देत नाही.'
आराध्याची कहाणी
1994मध्ये मिस वर्ल्डचा किताब जिंकणारी बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या रायचे लग्न 20 एप्रिल 2007 मध्ये अभिनेता अभिषेक बच्चनसोबत झाले. लग्नाच्या साडेचार वर्षांनंतर म्हणजे, 16 नोव्हेंबर 2011मध्ये ऐश्वर्याने आराध्याला जन्म दिला. ही आनंदाची बातमी बिग बींनी त्यांच्या टि्वटर अकाउंटवर दिली होती.
अभिषेकनेसुध्दा टि्वट करून सांगितले होते, 'आमच्या घरी एक गोंडस आणि गुटगुटीत मुलीने जन्म घेतला आहे. मी खूप आनंदी असल्याने मला झोपसुध्दा येत नाहीये. मी खूप उत्साही आहे.' त्यानंतर मार्च 2012मध्ये खूप विचार करून बच्चन कुटुंबीयांनी त्या मुलीचे नाव आराध्या ठेवले होते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि वाचा आराध्याच्या प्ले स्कुलमध्ये कशाप्रकारे 3 तास वेळ घालवते ऐश्वर्या...?