आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aishwarya Rai And Abhishek Bachchan's Daughter Aaradhya Turns Two Today

Happy B'day: दोन वर्षांची झाली अभि-ऐशची क्यूट आराध्या, बघा खास छायाचित्रे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

मुंबई - अमिताभ-जया बच्चन यांची नात आणि अभिषेक-ऐश्वर्या यांची लाडकी लेक आज दोन वर्षांची झाली. 16 नोव्हेंबर 2011 रोजी माजी जगतसुंदरी ऐश्वर्या राय बच्चन हिने आपल्या पहिल्या बाळाला जन्म दिला. अभिषेकने आराध्याच्या जन्माची बातमी ट्विटरवर देताना म्हटले होते, इट्स अ गर्ल ! ही बातमी येताच बच्चन कुटुंबीयांवर अभिनंदनाचा वर्षाव झाला होता.

आराध्याच्या जन्मानंतर तिची एक झलक बघण्यासाठी बच्चन कुटुंबीयांचे चाहते खूप आतुर झाले होते. गेल्यावर्षी बिग बींच्या वाढदिवशी आराध्याची पहिली झलक समोर आली होती. तेव्हापासून आराध्या अधूनमधून आपल्या आईबरोबर सार्वजनिक ठिकाणी दिसत असते.

आराध्या बॉलिवूडमधील सर्वात प्रसिद्ध सेलिब्रिटी किड ठरली आहे. आराध्या आज दोन वर्षांची झाली आहे, मात्र एवढ्या कमी वयात तिला गायत्री मंत्र तोंडपाठ आहे. तिला आयपॅड वापरता येतो. ती आयपॅडवर आपल्या आवडीची गाणी ऐकत असते. हे स्वतः बिग बींनी आपल्या ब्लॉगवर सांगितले होते.

आमच्याकडून आराध्याला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. पुढे क्लिक करा आणि बघा अभि-ऐशच्या क्युट लिटिल परीची खास छायाचित्रे....