बॉलिवूड ब्यूटी क्वीन
ऐश्वर्या राय बच्चन 'महिला दिना'च्या निमित्तावर सेक्सविषयी जागरुकता आणि एड्सपासून सुरक्षितता या कार्यक्रमात सामील झाली होती. यावेळी मुंबईच्या भाभा म्युनिसिपल हॉस्पिटलमध्ये HIVसाठी देशभरात चालणा-या 'UNAIDS' मिशनविषयीची पत्रकार परिषेत घेण्यात आली होती. या कार्यक्रमात ऐश्वर्या खूपच भावूक झाली आणि तिच्या डोळ्यात पाणी दिसले.
ऐश्वर्या राय बच्चन संयुक्त राष्ट्राशी संलग्न संस्था 'UNAIDS'ची आंतरराष्ट्रीय गुडविल अॅम्बेसेडर आहे. या निमित्तावर संयुक्त राष्ट्राच्या एड्स संबंधी संस्थेचे अधिकारीसुध्दा सामील झाले होते. ऐश्वर्या कार्यक्रमामध्ये प्रमुख पाहूणी म्हणून सामील झाली होती. तिने काळ्या रंगाचा पंजाबी सूट परिधान केलेला होता. या वेशभूषेत ती खूपच सुंदर दिसत होती.
एड्ससारख्या गंभीर आजारावर आयोजित या कार्यक्रमात ऐश्वर्याने लोकांना या आजाराच्या दुष्परिणामांविषयीची जागरुकता करून त्यांना उपचार घेण्याची पध्दतसुध्दा सांगितली.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा 'महिला दिना' निमित्त आयोजित या कार्यक्रमात पोहोचलेल्या ऐश्वर्याची काही छायाचित्रे...