आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aishwarya Rai Bachchan, Kareena, Farah Earn More Than Their Husbands

PHOTOS : या सेलिब्रिटी पत्नी करतात आपल्या पतीपेक्षा जास्त कमाई

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

सिनेनिर्मात्यांकडून तगडं मानधन घेण्यात बॉलिवूडच्या स्टार पत्नी आपल्या पतीपेक्षा दोन पावलं पुढे आहेत. बॉलिवुडमधल्या सुपरस्टार्सच्या कमाईचे आकडे पाहिले तर डोळे पांढरे व्हायची वेळ येते. एकेका सिनेमासाठी हे हिरो कोटीच्या कोटी रुपये मानधन घेतात. मात्र त्यांच्यापेक्षाही त्यांच्या पत्नीच्या कमाईचा आकडा अवाक् करणारा आहे, हे तुम्हाला ठाऊक आहे का ?
करीना कपूरपासून ते ऐश्वर्या राय बच्चनपर्यंत, फराह खानपासून ते मलायका अरोरा खानपर्यंत, बॉलिवूडमधील अशा अनेक स्टार पत्नी आहेत, ज्या आपल्या पतीपेक्षा जास्त कमाई करतात.
हे फक्त बॉलिवूडमधील चित्र नाहीये, तर हॉलिवूडमध्येसुद्धा अशी काही उदाहरणं आहेत, जिथे अभिनेत्रींच्या कमाईचा आकडा त्यांच्या पतीपेक्षा जास्त आहे. अँजेलिना जोली ब्रॅड पीटपेक्षा जास्त मावाते. 'सेक्स इन द सिटी' फेम सारा जेसिका पार्करची कमाईसुद्धा तिचा पती मॅथ्यू ब्रॉडरिकपेक्षा जास्त आहे.
या पॅकेजच्या माध्यमातून आम्ही तुम्हाला फिल्म इंडस्ट्रीतील अशा काही अभिनेत्रींविषयी सांगतोय ज्यांच्या कमाईचा आकडा बघून त्यांचे पतीसुद्धा अवाक् राहतात.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि जाणून घ्या ऐश्वर्या अभिषेकपेक्षा आणि करीना सैफपेक्षा किती जास्त कमाई करतात..