आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aishwarya Rai Bachchan Performance At Ponds Femina Miss India

MISS INDIAच्या मंचावर ऐश्वर्याने लावले ठुमके, पाहा छायाचित्रे

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक

बॉलिवूड स्टार ऐश्वर्या राय बच्चनने 'फेमिना मिस इंडिया 2013' च्या मंचावर धमाकेदार परफॉर्मन्स देऊन सगळ्यांचे होश उडवले. आई झाल्यानंतर ऐश्वर्या पहिल्यांदाच स्टेजवर ठुमके लावताना दिसली. तसे पाहता यापूर्वी ऐश्वर्या सोशल इवेंट्स किंवा पार्टीत अनेकदा दिसली. मात्र प्रेग्नंसीनंतर डान्स परफॉर्मन्स देण्याची ऐश्वर्याची ही पहिलीच वेळ होती.
'गुजारिश' सिनेमातील 'उडी...' या गाण्यावर ऐश्वर्याने धमाकेदार डान्स केला.

मुंबईतील यशराज स्टुडिओत 'मिस इंडिया 2013' चा शानदार सोहळा रंगला. पटियाळाच्या नवनीत धिल्लनने मिस इंडिया 2013 चा खिताब आपल्या नावी केला. या कार्यक्रमाला विवेक ओबरॉय, सोनू निगम, जॉन अब्राहम, चित्रांगदा सिंग, असिन, करण जोहर हे सेलिब्रिटी हजर होते.

पुढील स्लाईड्सवर क्लिक करा आणि पाहा ऐश्वर्याच्या परफॉर्मन्सची काही खास छायाचित्रे...