आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aishwarya Rai Bachchan Turns A Dark Princess On The Ramp For Longines

अनारकली ड्रेसमधल्या ऐश्वर्यावर खिळल्या सर्वांच्या नजरा, ब-याच दिवसांनी अवतरली रॅम्पवर

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
ऐश्वर्या राय बच्चन फिल्म इंडस्ट्रीतील बिझी मॉम्सपैकी एक आहे. माजी जगतसुंदरी ऐश्वर्या सध्या अनेक ब्रॅण्ड्सच्या होम अप्लायन्सेसच्या प्रमोशनमध्ये बिझी आहे. ऐश्वर्या ब्युटी प्रॉडक्ट्सपासून ते महागड्या घड्याळांचे प्रमोशन करत आहे.
पहिल्या बाळाच्या जन्मानंतर ऐश्वर्याने सिनेमांपासून ब्रेक घेतला आहे. मात्र अधूनमधून ती आपली झलक तिच्या चाहत्यांना दाखवत असते. या कार्यक्रमांमध्ये ती तिच्या आवडत्या अनारकली ड्रेसमध्ये दिसत असते.
अलीकडेच ती स्टेम सेल बँकिंगच्या लाँचिंग इवेंटमध्ये ब्लॅक फॉर्मल ड्रेसमध्ये दिसली होती, तर वॉच कलेक्शनच्या लाँचिंग इवेंटमध्ये ती ब्लॅक लहेंग्यात दिसली. या ड्रेसमध्ये ती खूपच सुंदर दिसली. ब-याच दिवसांनी तिने या कार्यक्रमात रॅम्पवॉकसुद्धा केला.
या पॅकेजमधून आम्ही तुम्हाला ऐश्वर्याची या कार्यक्रमादरम्यान क्लिक झालेली ही खास छायाचित्रे..