आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऐश्वर्यासोबत आराध्याची झलक बघण्यासाठी लुधियानाच्या रस्त्यांवर अशी लोटली गर्दी

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडमधील जेवढ्या अभिनेत्री आई आहेत, त्या ब-याच ठिकाणी आपल्या मुलांना सोबत घेऊन जात असतात. मात्र ऐश्वर्या राय बच्चन आपल्या लाडक्या लेकीला प्रत्येक ठिकाणी आपल्या सोबत घेऊन जात असते. अलीकडेच याचे उदाहरण बघायला मिळाले.
झालं असं, की ऐश्वर्या अलीकडेच कल्याण ज्वेलर्सच्या स्टोअर लाँचिंगसाठी लुधियानामध्ये गेली होती. तेथे ती आराध्यालाही आपल्यासोबत घेऊन गेली. जशी फोटोग्राफर्सची नजर आराध्यावर पडली, ते तिला आपल्या कॅमे-यात बंदिस्त करण्याचा प्रयत्न करु लागले.
जेव्हा ऐश्वर्या चंदीगड विमानतळावर उतरली, तेव्हा तर तिथे आराध्या आणि ऐश्वर्याची एक झलक बघण्यासाठी मोठ्या प्रमाणात गर्दी जमली. यावेळी आराध्या आपल्या आईच्या कडेवर शांत झोपलेली दिसली.
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन बघा आराध्या-ऐश्वर्याची विमानतळावरची छायाचित्रे. याशिवाय बघा कल्याण ज्वेलर्सच्या स्टोअर लाँचिंगमधली ऐश्वर्याची झलक..