आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aishwarya Rai Bachchan’S Surprise Birthday Party For Abhishek

पती अभिषेकसाठी ऐश्वर्या देणारेय सरप्राईज पार्टी, जाणून घ्या कोणकोण असतील पाहुणे

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूड अभिनेता अभिषेक बच्चन 5 फेब्रुवारीला आपला 37वा वाढदिवस साजरा करत आहे. यानिमित्ताने त्याची पत्नी ऐश्वर्या राय बच्चनने त्याच्यासाठी एका खास सरप्राईज पार्टीचे आयोजन केले आहे. या पार्टीत अभिषेकचे फिल्म इंडस्ट्रीतील जवळचे मित्र अर्थातच शाहरुख खान, राकेश ओमप्रकाश मेहरा, रोहन सिप्पी, अपूर्व लाखिया, सिकंदर खेर, बिपाशा बसू आणि प्रिती झिंटा हजर राहणार शक्यता आहे.
अभिषेकच्या एका मित्राने मीडियाला सांगितले, ''ऐश्वर्याने आम्हा सगळ्या मित्रांना चेतावनी दिली आहे, की या पार्टीविषयी बाहेर कुठेही वाच्यता करु नये. इतकेच नाही तर अभिषेक आणि ऐश्वर्याचे जे कॉमन फ्रेंड्स आहेत, तेदेखील आपापसांत या पार्टीविषयी बोलत नाहीयेत. त्यामुळे या पार्टीत नेमके कोणते सेलिब्रिटी हजेरी लावतील, हे सांगता येत नाहीये.''
असो, अभिषेकला त्याच्या या खास दिवसाच्या प्लानिंगविषयी विचारले गेले, तेव्हा तो म्हणाला, ''37 वर्षांचे होणे हा अनुभव माझ्यासाठी 35 किंवा 36 वर्षांचे झाल्याप्रमाणेच आहे. 5 फेब्रुवारी रोजी मी दिवसभर शुटिंग करणार असून संध्याकाळी आपल्या कुटुंबाला भेटणार आहे.''
पुढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या अभिषेक आणखी काय काय म्हणाला...