आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत
डाउनलोड कराऐश्वर्या राय-बच्चनच्या चाहत्यांसाठी खुशखबर आहे. ऐशचे रुपेरी पडद्यावर दोन वर्षांनंतर पुनरागमन होण्याची चिन्हे आहेत. आराध्याच्या जन्मानंतर अर्थात 2011 नंतर तिने कोणताही सिनेमा स्वीकारला नाही; परंतु आता मात्र ती पुनरागमनाच्या तयारीत आहे. तेही वरुण धवनसारख्या नवोदित कलावंतासोबत ती पडद्यावर येऊ शकते.
दिग्दर्शक श्रीराम राघवन यांची ही कल्पना आहे. अद्याप हा प्रकल्प प्राथमिक टप्प्यात असला तरी काही आठवड्यांपासून वरुण आणि श्रीराम यांच्यात त्यावर बरीच चर्चाही झाली आहे. वरुणची तयारी आहेच. ऐश्वर्याकडून होकाराची अपेक्षा आहे. सर्वकाही ठीक राहिले तर याचवर्षी सिनेमाचे चित्रीकरण सुरू होऊ शकते. डेव्हिड धवनपुत्र वरुण सध्या 'मै तेरा हीरो' या एकता कपूरच्या सिनेमात व्यग्र आहे.
चला तर बच्चन बहू नवोदित वरुण धवनबरोबर काम करण्यास होकार देणार का ? हे बघणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
Copyright © 2023-24 DB Corp ltd., All Rights Reserved
This website follows the DNPA Code of Ethics.