आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा
  • Marathi News
  • Aishwarya Rai Is The World's Fourth Beautiful Lady

ऐश्वर्या ठरली जगातील चौथी सर्वाधिक सुंदर महिला, जाणून घ्या तिच्याविषयीच्या रंजक गोष्टी!

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
'हॉलिवूड बज' या मॅगझिनने बॉलिवूड अभिनेत्री ऐश्वर्या राय बच्चनची निवड जगातील चौथ्या क्रमाकांची सर्वाधिक सुंदर महिला म्हणून केली आहे. ऐश्वर्या कदाचित एकमेव अशी महिला आहे, जी 1994मध्ये मिस वर्ल्डचा किताब आपल्या नावी केल्यानंतर वीस वर्षांनीसुद्धा जगातील सुंदर महिलांमध्ये गणली जाते.
मिस वर्ल्ड होण्यापूर्वी ऐश्वर्याला परीक्षकांनी प्रश्न केला होता, की एका मिस वर्ल्डमध्ये कोणती वैशिष्ट्ये असायला हवी. याचे उत्तर देताना ऐश्वर्या म्हणाली होती, की तिला रंग आणि देशादेशातील भेदभावांपेक्षा वर उठून दिसायला हवं.
अमेरिकन अभिनेत्री जुलिया रॉबर्ट्स ही देखील ऐश्वर्याला जगातील सर्वाधिक सुंदर महिला समजते. तर हॉलिवूड स्टार ब्रॅड पिटची ऐश्वर्यास काम करण्याची इच्छा आहे. 21व्या वर्षी आर्किटेक्चरचा अभ्यास करणा-या ऐश्वर्याने मिस वर्ल्डचा किताब मिळवल्यानंतर मॉडेलिंगवरच लक्ष देण्याचा विचार केला होता. मात्र लवकरच ही मिस वर्ल्ड पेप्सी आणि कॅलिनच्या जाहिरातींमधून दिग्दर्शकांमध्ये नीळ्या डोळ्यांची मुलगी म्हणून ओळखली जाऊ लागली.
मणिरत्नम यांच्या 'इरुवर' (1997) या तामिळ सिनेमाद्वारे ऐश्वर्या पहिल्यांदा मोठ्या पडद्यावर झळकली. हा सिनेमा बॉक्स ऑफिसवर यशस्वी ठरला. त्यानंतर 'जीन्स '(1998) या सिनेमामुळे ती पुन्हा एकदा हिंदी सिनेमांच्या दिग्दर्शकांच्या नजरेत आली. याचदरम्यान संजय लीला भन्साळी 'हम दिल दे चुके सनम' या सिनेमाच्या स्क्रिप्टवर काम करत होते. लीड रोलसाठी त्यांनी ऐश्वर्याचा नावाचा विचार केला, तेव्हा ती आपल्या अभिनयाने लोकांना प्रभावित करु शकणार नाही, असा सूर उमटला होता. मात्र संजय लीला भन्साळी यांनी ऐश्वर्यालाच या सिनेमासाठी निवडले आणि या सिनेमाने बॉक्स ऑफिसवर केलेली कमाल आपल्या सर्वांनाच ठाऊक आहे.
पु़ढील स्लाईड्सवर क्लिक करुन जाणून घ्या ऐश्वर्याविषयीच्या रंजक गोष्टी...