आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

हिंदीमध्ये डब होणार ऐश्वर्याचा सिनेमा

7 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
मणिरत्नम यांच्या आगामी प्रोजेक्टमधून सिनेमांमध्ये पुनरागमनाची तयारी करणा-या ऐश्वर्या राय बच्चनचा सिनेमा हिंदीमध्ये डब होणार आहे. तसे पाहता दोन भाषांमध्ये तयार होणा-या सिनेमाची शुटिंग एकसोबत केली जात होती. परंतु या सिनेमाचे सुत्र काही वेगळेच आहेत.
महेश बाबू, नागार्जुन आणि श्रुती हसनसोबत बनवल्या जाणा-या या सिनेमाला तेलगूमध्ये बनवण्यात येणार आहे. त्यानंतर तो हिंदी आणि तमिळमध्ये डब केले जाणार आहे. या सिनेमामध्ये यापूर्वी अनेक अडचणी आल्या आहेत.
यापूर्वी अशी बातमी होती, की ऐश्वर्या हा सिनेमा करणार नाहीये. परंतु नंतर असे कळाले, की तिच्या म्हणण्याप्रमाणे सिनेमात अनेक बदलाव केले जात आहेत. ते काही असो पण, असे पहिल्यांदा होत आहे, की ऐश्वर्याचा हा सिनेमा आधी मुळ तेलगू भाषेत तयार होईल आणि त्यानंतर हिंदी प्रेक्षकांना तो डब केलेला सिनेमा बघायला मिळणार आहे.