आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

Happy Anniversary: न्यासा-युगसोबत असा वेळ घालवतात अजय आणि काजोल

8 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
बॉलिवूडची सिमरन अर्थातच काजोलने बॉलिवूडचा सिंघम अजय देवगणसोबत लग्न करून आज 15 वर्षे झाली आहेत. 24 फेब्रुवारी 1999मध्ये काजोल आणि अजय यांनी लग्न केले होते. काजोलने लग्न केल्यानंतरही अनेक सुपरहिट सिनेमे दिले. त्यामध्ये 'कभी खुशी कभी गम' आणि 'माय नेम खान' हे सिनेमे सामील आहेत. तिला या दोन्ही सिनेमांसाठी फिल्मफेअर उत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार मिळाला होता.
1998मध्ये आलेल्या 'प्यार तो होना ही था' सिनेमामध्ये काजोल आणि अजय यांची केमिस्ट्री प्रेक्षकांच्या पसंती पडली होती. तेव्हा कुणाला चाहूलही नव्हती, की मोठ्या पडद्यावर एकत्र दिसणारी ही जोडी ख-या आयुष्यात कायमची एकत्र येऊ शकते. अजय आणि काजोल यांनी सर्वात पहिले 'गुंडराज' सिनेमात एकत्र काम केले होते. दोघांनी कोणत्याही वादात न अडकता त्यांचे नाते लग्नापर्यंत नेले. त्यांचे लग्न महाराष्ट्रीय पद्धतीने झाले होते.
अजय आणि काजोल यांचे एकत्र सिनेमे
साल फिल्म
1995 गुंडाराज
1995 हलचल
1997 इश्क
1998 प्यार तो होना ही था
1999 दिल क्या करे
अजय-काजोलचची दोन मुले
10 वर्षांची न्यासा आणि 3 वर्षांचा युग हे अजय आणि काजोलची मुले आहेत.
लग्नानंतर काजोलने तीन वर्ष फिल्म इंडस्ट्रीमध्ये काम केले. परंतु सध्या ती बॉलिवूडच्या जगातून बाहेर आली आहे आणि मुलांकडे लक्ष देत आहे. ती नेहमी तिच्या मुलांच्या शाळेतील कार्यक्रमात दिसते. काजोल अजय आणि मुलांना वेळ देत असतानाच आपली बहीणी तनिषा आणि आई तनुजा यांचाही काळजी घेते. जेव्हापासून युग शाळेत जातो आहे, तेव्हापासून काजोल पार्टीज आणि अवॉर्ड फंक्शनमध्येही दिसते.
पुढील स्लाइड्सवर क्लिक करा आणि बघा अजय आणि काजोल त्यांच्या मिलांसोबत कसा वेळ घालवतात