आपल्या शहरातील ताज्या बातम्या आणि ई-पेपर मिळवा मोफत

डाउनलोड करा

ऑक्टोबरमध्ये प्रदर्शित होणार ‘अॅक्शन जॅक्सन’

9 वर्षांपूर्वी
  • कॉपी लिंक
प्रभुदेवा दिग्दर्शित अजय देवगणचा ‘अॅक्शन जॅक्सन’ आता जूनऐवजी ऑक्टोबरमध्ये प्रदर्शित होणार आहे. निर्माता गोवर्धन तनवानी आणि अजयने चित्रपट प्रदर्शित करण्यासाठी दोन तारखा निवडल्या आहेत. त्यातील पहिली तारीख 2 ऑक्टोबर, तर दुसरी 9 ऑक्टोबर आहे.
2 ऑक्टोबर रोजी हृतिक रोशन आणि कतरिना कैफचा ‘बॅँग बॅँग’ प्रदर्शित होत असल्याची घोषणा करण्यात आली असून चित्रपटाचे शूटिंगदेखील युद्धपातळीवर सुरू आहे. मात्र, काही कारणांमुळे हृतिकचा चित्रपट प्रदर्शित होणार नसेल तर या दिवशी अजयच्या ‘अॅक्शन जॅक्सन’चा नंबर लागण्याची शक्यता आहे. कदाचित ‘बॅँग बॅँग’ ठरलेल्या दिवशी प्रदर्शित होत असेल तर अजय पुढच्या शुक्रवारी म्हणजेच 9 ऑक्टोबर रोजी आपला चित्रपट प्रदर्शित करेल.
ऑक्टोबरमधील या दोन तारखांच्या हिशेबाने चित्रपटाची उर्वरित तयारी सुरू आहे. अजयचे या चित्रपटातील 25 दिवसांचे शुटिंग बाकी असून तो 10 मार्च रोजी सुरू होत असलेल्या ‘सिंघम 2’ च्या शेड्यूलमध्ये बदल करू इच्छित नाही. त्यामुळे ‘सिंघम 2’चे शेड्यूल पूर्ण झाल्यानंतरच ‘अॅक्शन जॅक्सन’चे उर्वरित शूटिंग करण्यात येणार आहे.